मनोज शिंगाणे यांचे वाढदिवसाचे औचित्य; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अन्नदान आणि मिष्ठान्न सेवा कार्यक्रम
1 min read

मनोज शिंगाणे यांचे वाढदिवसाचे औचित्य; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अन्नदान आणि मिष्ठान्न सेवा कार्यक्रम

Loading

मनोज शिंगाणे यांचे वाढदिवसाचे औचित्य; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अन्नदान आणि मिष्ठान्न सेवा कार्यक्रम

 

अमळनेर प्रतिनिधी – सामाजिक कार्यकर्ते आणि रक्तदान चळवळीचे प्रणेते मनोज शिंगाणे यांनी यावर्षीही आपल्या वाढदिवसाचे औचित्य अत्यंत समाजोपयोगी पद्धतीने साजरे केले. पारंपारिक सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडवत त्यांनी आपल्या कुटुंबासह चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित पारोळा येथील दिव्यांग मुला-मुलींच्या निवासी शाळेत विशेष कार्यक्रम आयोजित केला.
या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांना मिष्ठान्न आणि पौष्टिक अन्नदान करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश आणला गेला. कार्यक्रमाचे मार्गदर्शन मा. श्री. डॉ. योगेश रघुनाथ महाजन (अध्यक्ष – चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे) आणि शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. मनीष किसन जाधव यांनी केले.
कार्यक्रमात युवा सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे यांचे संपूर्ण कुटुंब, मित्रपरिवार तसेच शाळेतील सर्व विशेष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक समर्पण आणि मानवतेची जाणीव वाढवणारा हा कार्यक्रम उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
मनोज शिंगाणे यांच्या या उपक्रमातून असे स्पष्ट होते की, समाजसेवा ही केवळ एक कर्तव्य नाही तर जीवनातील आनंद आणि वाढदिवसाच्या साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्गही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *