मतदारांनो सजग व्हा! — बोगस पदांच्या जंजाळातून बाहेर या!  राजकारणातील घसरती पातळी, पैसेवाल्यांचा वाढता हस्तक्षेप आणि बनावट डिग्रीधारकांची वाढती धाडसी पोळी—यांचा फटका थेट जनतेच्याच आयुष्यावर!
1 min read

मतदारांनो सजग व्हा! — बोगस पदांच्या जंजाळातून बाहेर या! राजकारणातील घसरती पातळी, पैसेवाल्यांचा वाढता हस्तक्षेप आणि बनावट डिग्रीधारकांची वाढती धाडसी पोळी—यांचा फटका थेट जनतेच्याच आयुष्यावर!

Loading

मतदारांनो सजग व्हा! — बोगस पदांच्या जंजाळातून बाहेर या!

राजकारणातील घसरती पातळी, पैसेवाल्यांचा वाढता हस्तक्षेप आणि बनावट डिग्रीधारकांची वाढती धाडसी पोळी—यांचा फटका थेट जनतेच्याच आयुष्यावर!

अमळनेर प्रतिनिधी
आजच्या काळात राजकीय दुकानदारी ही ‘पैसा कमवा आणि पद मिळवा’ अशी बाजारपेठ बनली आहे. पैसे भरून बोगस पदे, बनावट डिग्री, बनावट कौशल्य आणि खोटा प्रभाव निर्माण करणारे अनेक जण जनतेची फसवणूक करत आहेत.
डॉक्टर व्हायचं असेल तर पैशाने डिग्री, शिक्षक व्हायचं असेल तर पैसे भरून पात्रता, इंजिनिअर व्हायचं असेल तर पैशाने सर्टिफिकेट… आणि मग? मग या खोट्या पात्रतेमुळे रुग्णांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांच्या जीवाशी खेळ सुरू!

त्यातूनच पाडण्याजोगे रस्ते, ६ महिन्यात तडे जाणारे पूल, कागदोपत्रीच पूर्ण होणारे विकासकाम — या सर्वांची मुळे बोगस पात्रतेतील भ्रष्ट प्रवृत्तीत आहेत.

🔍 मतदारांनो—विचारा, विचार करा, आणि मगच मतदान करा!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दारात उभे असताना जनतेची जबाबदारी अधिक वाढली आहे.
उमेदवारांना प्रश्न विचारणे हा तुमचा लोकशाही हक्क आहे:

तुमच्या वार्डातील रस्ता कधी होणार?

गटारव्यवस्था सुधारण्यासाठी काय योजना?

२४ तास पाणी पुरवठा शक्य आहे का?

आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी कटिबद्ध आहात का?

संकटसमयी लोकांसाठी धावून आले आहेत का?

आज तुमचं एक मत म्हणजे पुढील ५ वर्षांचा विकास किंवा विनाश!

❌ कोणाला मतदान करू नये?

बोगस डिग्रीधारक

पैशाने उमेदवारी घेणारे

चमकोतंत्रावर जगणारे

दोन नंबरच्या धंद्यात गुंतलेले

समाजकारणात अजिबात रस नसलेले

हे उमेदवार लोकांसाठी नाहीत—ते फक्त पदासाठी उभे आहेत!

✔️ कोणाला मतदान करावं?

प्रामाणिक, विश्वासू, लोकांशी जोडलेला

अडचणीत फोन केल्यावर धावून येणारा

वार्डातील समस्या जाणणारा

समाजसेवेचे खरे भान असलेला

ज्याच्यासाठी ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ आहे

शांतचित्ताने लोकांची कामे करणारा

विकासाभिमुख आणि जबाबदार उमेदवार

काही उमेदवार नवखे असतात, पण समाजाबद्दलची बांधिलकी त्यांची खरी ओळख असते.
काही उमेदवार अचानक चमकतात—आणि मग पाच वर्षे गायब होतात. अशांपासून सावध राहा!

🌟 तुमचं लाखमोलाचं एक मत—इतिहास लिहू शकतं!

पैशाला, चमकदार आश्वासनांना, बाहेरून आणलेल्या पदांना बळी पडू नका.
इमान विकू नका.
तुमचा अधिकार जपा.

योग्य उमेदवार निवडा, विकास निवडा, भविष्य निवडा!

अमळनेर नगरपरिषद अमळनेर निवडणुक 2025
वॉर्ड क्रमांक 13 ब पुरुष अधिकृत अपक्ष उम्मीदवार
🙏🏻🙏🏻🙏🏻
*सुनिल दयाराम महाजन *
स्वेच्छा सेवा निवृत्त पोलिस हेड कॉन्स्टेबल तथा समाजात नव परिवर्तन व सामाजिक सुधारणा वादी व तरुणांमध्ये नव चैतन्य, विश्वास व उम्मेद निर्माण करू इच्छिणारा समाज सेवक.
वार्ड क्रमांक 13 ब सर्वसाधारण पुरुष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *