नगराध्यक्ष  पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना मोबाईल व्यापारी असोसिएशनने दिला शहर विकास आघाडीला प्रचंड पाठिंबा
1 min read

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना मोबाईल व्यापारी असोसिएशनने दिला शहर विकास आघाडीला प्रचंड पाठिंबा

Loading

नगराध्यक्ष  पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना मोबाईल व्यापारी असोसिएशनने दिला शहर विकास आघाडीला प्रचंड पाठिंबा

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर शहरातील मोबाईल व्यापारी असोसिएशनने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडीला प्रचंड पाठिंबा जाहीर केला आहे. शहराच्या विकासाचे दूरदृष्टीचे व्हिजन आणि व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेता, असोसिएशनने आघाडीला कायम पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.
कार्यक्रमात जितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना आश्वासन दिले की, शहर विकास आघाडी व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच आवाज उठवेल, तसेच रस्त्यावर व्यवसाय करताना येणाऱ्या समस्यांचे हक्काने समाधान केले जाईल.
मोबाईल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण बी. महाजन यांनी व्यापाऱ्यांना आघाडीला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, शहराच्या विकासासाठी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी आघाडीच्या नेतृत्वाखाली काम करणे अत्यंत आवश्यक आहे.
या कार्यक्रमात अध्यक्ष प्रविण महाजन यांसह निलेश चौधरी, तन्वीर मोमिन, रेहान शेख, महेश नागदेव, भागवत वाणी, मेकर्स सोनार, निलेश पाटील, लालसाई सिंधी, राहुल ठाकूर, निलेश कोळी, दीपक भगवानी, दिनेश जैन, प्रवीण भाटिया यांसह मोठ्या प्रमाणावर व्यापारी बांधव उपस्थित होते.
मोबाईल व्यापारी असोसिएशनच्या या पाठिंब्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र ठाकूर यांचा प्रचार अधिक बळकट होईल आणि शहर विकास आघाडीच्या आगामी निवडणुकीत जनतेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *