अंकुर सेवा सेतू प्रकल्प व रोटरी क्लब अमळनेरचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श – रोटरी डिस्टिक गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे
1 min read

अंकुर सेवा सेतू प्रकल्प व रोटरी क्लब अमळनेरचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श – रोटरी डिस्टिक गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे

Loading

अंकुर सेवा सेतू प्रकल्प व रोटरी क्लब अमळनेरचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श – रोटरी डिस्टिक गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे

अमळनेर : रोrटरी क्लब अमळनेर, आधार बहुउद्देशीय संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने अंकुर सेवा सेतू प्रकल्पा अंतर्गत मागील सहा वर्षांपासून एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ व एकल पालक मुलांसाठी चालू असलेला प्रोटीन किट व सकस आहार प्रकल्प आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केला जाणार असल्याची घोषणा रोटरी इंटरनॅशनल 3030 चे डिस्टिक गव्हर्नर (DG) श्री. ज्ञानेश्वर शेवाळे यांनी अमळनेर भेटीदरम्यान केली.

रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी OCV (Official Club Visit) निमित्त DG शेवाळे यांनी अमळनेर रोटरी क्लबला भेट दिली. त्यावेळी एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांसाठी प्रोटीन किट व सकसहार किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अमळनेरचा प्रकल्प – महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल

DG ज्ञानेश्वर शेवाळे म्हणाले –
“अमळनेर रोटरी क्लबने सलग सहा वर्षांपासून चालवलेला हा प्रकल्प प्रेरणादायी आहे. एचआयव्ही सहज जगणाऱ्या मुलांसाठी प्रोटीन सपोर्ट देण्याचा हा उपक्रम आता रोटरी ३०३० अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सुरू केला जाईल.”

तसेच पुढील दोन महिन्यांसाठी प्रोटीन किट वाटपाचे आर्थिक योगदान स्वतः देण्याची घोषणा DG रो.शेवाळे यांनी केली.

अमळनेर रोटरी क्लब, आधार बहुउद्देशीय संस्था आणि अंकुर सेवा सेतू प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ व एकल पालक मुलांसाठी दर महिन्याला राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोटीन किट व पौष्टिक आहार’ प्रकल्पाच्या अंतर्गत आजचा उपक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे डिस्टिक गव्हर्नर (DG) ज्ञानेश्वर शेवाळे यांनी अमळनेर क्लबची OCV (Official Club Visit) केली. त्यांच्या भेटीनिमित्त मुलांना प्रोटीन किटचे वाटप करण्यात आले

आजच्या उपक्रमातील प्रोटीन किट श्री. सुशील जैन यांनी देणगी म्हणून प्रदान केले. सकसहार कीट आधार संस्थेमार्फत देण्यात आले त्याबाबत रोटरी क्लबने त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

अमळनेरचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श

डिस्टिक गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अमळनेर रोटरी क्लब मागील सहा वर्षांपासून सातत्याने राबवत असलेल्या या प्रकल्पाचे विशेष कौतुक केले.

🔹 “अमळनेरमध्ये रुजलेले हे कार्य आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करावे,”
असा संदेश देत त्यांनी डिस्टिक ३०३० अंतर्गत सर्व रोटरी क्लबमध्ये ‘एचआयव्ही सह जगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोटीन किट प्रकल्प’ सुरू करण्याची घोषणा केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार

प्रास्ताविक – डॉ. भारती पाटील (अध्यक्ष, आधार बहुउद्देशीय संस्था)
डॉ. पाटील यांनी मुलांबद्दल सातत्याने चालणाऱ्या सेवाकार्यातील महत्त्व व रोटरीचा सहभाग स्पष्ट केला.

सूत्रसंचालन – रो. अभिजीत भंडारकर यांनी प्रभावी सूत्रसंचालन करत कार्यक्रमाला ऊर्जित स्वर दिली.

🙏 आभार प्रदर्शन – सौ. रेणू प्रसाद (कार्यकारी संचालिका, आधार संस्था)
रेणू प्रसाद यांनी सर्व दाते, उपस्थित सदस्य, रोटरी क्लब आणि अंकुर सेवा सेतू प्रकल्पातील टीमचे आभार मानले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला खालील मान्यवरांची उपस्थिती होती :

रो. देवेंद्र कोठारी – अध्यक्ष, रोटरी क्लब अमळनेर
रो. आशिष चौधरी – सचिव, रोटरी क्लब अमळनेर

रो.डॉ.राहुल मुठे, रो. कीर्तीकुमार कोठारी रो. राजेश जैन रो. रोहित सिंघवी रो. वृषभ पारख, रो. प्रतिक जैन
असिस्टंट गव्हर्नर रो.पूनम कोचर
तसेच रोटरी सदस्य, आधार संस्थेचे कार्यकर्ते व मुलांचे पालक उपस्थित होते.

प्रकल्पासाठी विशेष परिश्रम

या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वीतेत
प्रकल्प समन्वयक – संजय कापडे व पूनम पाटील
यांनी मोलाची भूमिका बजावली.

सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श

अमळनेर रोटरी क्लब आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांनी एकत्र येऊन गेली अनेक वर्षे या मुलांमध्ये आत्मविश्वास, पोषण आणि सामाजिक स्वीकार निर्माण करण्याचे कार्य केले आहे. डिस्टिक गव्हर्नर शेवाळे यांच्या घोषणेने आता हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *