“प्रभाग 13-B मध्ये प्रामाणिक नेतृत्वाची शपथ! सुनिल महाजन यांची 500 रुपयांच्या प्रतिज्ञापत्रातून भ्रष्टाचारविरहित विकासाची हमी”
1 min read

“प्रभाग 13-B मध्ये प्रामाणिक नेतृत्वाची शपथ! सुनिल महाजन यांची 500 रुपयांच्या प्रतिज्ञापत्रातून भ्रष्टाचारविरहित विकासाची हमी”

Loading

प्रभाग 13-B मध्ये प्रामाणिक नेतृत्वाची शपथ!
सुनिल महाजन यांची 500 रुपयांच्या प्रतिज्ञापत्रातून भ्रष्टाचारविरहित विकासाची हमी”

अमळनेर प्रतिनिधी:
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13-B मध्ये परिवर्तनाच्या दिशेने एक महत्वाचा व ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. स्वेच्छा सेवा निवृत्त पोलिस हेड कॉन्स्टेबल, उच्चशिक्षित, तरुणांमध्ये सकारात्मक ऊर्जा ओतणारे व स्वच्छ, निस्वार्थ नेतृत्वाची ओळख निर्माण करणारे अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांनी आज आपल्या प्रभागातील नागरिकांसमोर 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सत्य प्रतिज्ञापत्र लिहून देत अविश्वासाला जागाच न ठेवणारे अभूतपूर्व पाऊल उचलले आहे.
मतदारांसाठी दिलेले हे सार्वजनिक प्रतिज्ञापत्र केवळ आश्वासने नाहीत—तर जवाबदारीची अटूट शपथ आहे. प्रभागाच्या भविष्याचा संपूर्ण बदल घडविण्याची महाजन यांची इच्छाशक्ती त्यातून स्पष्ट दिसते.

🔶 प्रत्यक्ष लोकांसमोर दिलेली 12 मुद्द्यांची शपथ — मतदारांशी बांधिलकीची लिखित खात्री

महाजन यांनी केलेल्या प्रतिज्ञेत प्रामाणिकता, पारदर्शकता व जनसेवा यांची ठाम भूमिका दिसून येते—

1. माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणाच्याही नावाने नगरपालिकेचे ठेके घेणार नाही आणि घेऊ देणार नाही.

2. माझ्या निकटवर्तीयांकडून स्वतःच्या फायद्यासाठी ठेके घेण्याचा कोणताही प्रयत्न होणार नाही.

3. या पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर माझ्या जागी कोणता निस्वार्थी, गुणी व्यक्ती उभा असेल तर मी पुढील निवडणूक लढवणार नाही.

4. जाहीरनाम्यातील सर्वच आश्वासने मी वेळेत आणि प्रामाणिकपणे पूर्ण करेन.

5. नागरिकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे हेच माझे कर्तव्य असेल.

6. नगरपालिकेतील कोणत्याही भ्रष्टाचारात सामील होणार नाही, उलट भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आघाडीवर राहीन.

7. सामान्य नागरिकांच्या सहभागातून ‘दबाव गट’ तयार करून स्वच्छ, सुंदर अमळनेरसाठी सतत लढत राहीन.

8. रस्ते, गटारी, सार्वजनिक संडास, मुतारी, सफाई यावर प्राधान्याने काम करेन.

9. रस्त्यांवरील लाईट दुरुस्ती व नवीन लाईट बसवणे, नियमित पाणीपुरवठा—या मूलभूत सोयी शंभर टक्के व्यवस्थित करेन.

10. कामात त्रुटी किंवा असमर्थता दिसल्यास—मी स्वतःहून पदाचा राजीनामा देईन.

महाजन यांचे प्रतिज्ञापत्र ऐकून वाचून प्रभागातील नागरिकांमध्ये अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांत प्रथमच प्रभागात कागदावर लिहून जबाबदारीची सार्वजनिक शपथ देणारा उमेदवार समोर आल्याने मतदारांमध्ये विश्वासाची नवी लाट निर्माण झाली आहे.

सुनील महाजन — शिक्षण, प्रामाणिकता आणि दूरदृष्टी यांचे परिपूर्ण मिश्रण

MA इतिहास

BA इतिहास व इंग्रजी

D.Ed

SET (इतिहास)

Ph.D PET दोनदा उत्तीर्ण

स्वेच्छा सेवाग्रही, निवृत्त पोलिस हेड कॉन्स्टेबल

शिस्त, सार्वजनिक हित आणि निस्वार्थ कार्यात आघाडीचे नेतृत्व

उच्चशिक्षित, अभ्यासू, शांत स्वभावाचे व सर्वांना आपलं करणारे सुनील महाजन हे तरुणांमध्ये सकारात्मक विचार आणि राष्ट्रहिताची भावना रुजविणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रभागात ओळखले जातात.

प्रभाग 13-B ची एकच हाक— “सत्य, स्वच्छता आणि सेवा… आता नेतृत्व सुनील महाजनच!”

महाजन यांनी दिलेली प्रत्यक्ष शपथ आणि सार्वजनिक प्रतिज्ञापत्र पाहता नागरिकांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू एकच—
“जे लिहून देतात, तेच करून दाखवतात!
प्रभाग 13-B ला हवे असेच प्रामाणिक व पारदर्शक नेतृत्व— सुनील दयाराम महाजन!”

नेहमीच आपल्या सेवेत
सुनील दयाराम महाजन
(अपक्ष उमेदवार – प्रभाग 13-B, अमळनेर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *