अमळनेरच्या 13-B प्रभागात बदलाची हाक… मतदारांचा एकमुखी नारा— ‘सुनिल महाजनच हवे!’”
1 min read

अमळनेरच्या 13-B प्रभागात बदलाची हाक… मतदारांचा एकमुखी नारा— ‘सुनिल महाजनच हवे!’”

Loading

अमळनेरच्या 13-B प्रभागात बदलाची हाक… मतदारांचा एकमुखी नारा— ‘सुनिल महाजनच हवे!’”

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन):
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या तोंडावर वॉर्ड क्रमांक 13-B (सर्वसाधारण पुरुष) या प्रभागात नवपरिवर्तनाच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत. स्वेच्छा सेवाग्रही, सेवानिवृत्त पोलिस हेड कॉन्स्टेबल, समाजहितचिंतक व तरुणांमध्ये नवी उमेद निर्माण करणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व सुनिल दयाराम महाजन यांनी अधिकृत अपक्ष उमेदवार म्हणून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.
प्रचाराची पहिलीच लाट उठताच प्रभागातील नागरिक, तरुण, महिलावर्ग व ज्येष्ठ मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाजन यांच्याभोवती ऐक्याची भक्कम वलय निर्माण केल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्यामागे उभे असलेले मित्रपरिवाराचे मोठे जाळे, मनमोकळा संवाद आणि सर्वांना आपलेसे करणारी सहजसुंदर शैली—या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून प्रभागात महाजन यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
“आता 13-B ला हवा आहे सक्षम, प्रामाणिक आणि ठोस निर्णय क्षमता असलेला नगरसेवक… सुनील महाजनच हवा!” असा एकमुखी आवाज मतदारांमध्ये उमटताना दिसत आहे. अनेक वर्षांची प्रशासकीय सेवा, शिस्तबद्ध कार्यपद्धती, स्वच्छ प्रतिमा आणि प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी असलेले त्यांचे मोठे व्हिजन—यामुळे नागरिकांमध्ये आशावादाची नवी लाट निर्माण झाली आहे.
प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, तरुणांसाठी उपक्रम, वरिष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि सर्वसमावेशक विकासाचा आराखडा तयार करण्याची क्षमता महाजन यांच्यात असल्याचे मतदार बांधव-भगिनी स्पष्ट शब्दांत व्यक्त करत आहेत. त्यांची मितभाषी स्वभाव, लोकांशी जोडून घेण्याची कला आणि “कामच महत्त्वाचे” ही भूमिका प्रभागाच्या राजकारणात नवी ऊर्जा निर्माण करत आहे.

सध्या 13-B प्रभागात एकच चर्चा—
“विकासाचा नवा मार्ग, नवे नेतृत्व… नगरसेवक म्हणून आता फक्त सुनील महाजन!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *