अमळनेर नगरपरिषद निवडणूक : अधिकृत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पालकमंत्री यांची सदिच्छा भेट
1 min read

अमळनेर नगरपरिषद निवडणूक : अधिकृत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पालकमंत्री यांची सदिच्छा भेट

Loading

अमळनेर नगरपरिषद निवडणूक : अधिकृत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पालकमंत्री
यांची सदिच्छा भेट

अमळनेर प्रतिनिधी :
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, आज अमळनेर शहरातील अधिकृत शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परिक्षीत श्रीराम बाविस्कर यांनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते मा. गुलाबराव पाटील साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत निवडणुकीची दिशा, शहरातील पाणी पुरवठ्याशी संबंधित प्रलंबित प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा, तसेच पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. मंत्री गुलाबराव पाटील यांनी डॉ. बाविस्कर यांचे कामाचे कौतुक करत आगामी निवडणुकीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद दिले. शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा सल्ला देत त्यांनी पक्षाच्या विजयाबाबत विश्वासही व्यक्त केला.
उमेदवार डॉ. परिक्षीत बाविस्कर यांनी मंत्री महोदयांचे मार्गदर्शन आणि सकारात्मक सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत, अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या भेटीनंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे नवचैतन्य निर्माण झाले आहे. डॉ बाविस्कर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्यासाठी शिंदे गटाचे व
माजी आमदार शिरीषदादा चौधरी व मित्रपरिवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती..यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *