कल्याण येथील अनुसयाबाई भामरे यांचे दुःखद निधन
1 min read

कल्याण येथील अनुसयाबाई भामरे यांचे दुःखद निधन

Loading

कल्याण येथील अनुसयाबाई भामरे यांचे दुःखद निधन

ठाणे:कल्याण( प्रतिनिधी)कल्याण येथील समाजबांधव,छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी सचिव श्री.गणेश अमृत भामरे,श्री.दिनेश अमृत भामरे, श्री .मंगेश अमृत भामरे यांच्या मातोश्री “श्रीमती अनुसयाबाई अमृत भामरे (वय ८२) यांचे आज गुरुवार, दि.१३.११.२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. वृध्दापकाळामुळे कल्याण येथे दु:खद निधन झाले. गुरुवार, दि. १३/११/२०२५ रोजी रात्री ०८.०० वा. कल्याण (पश्चिम) येथील अंत्यविधी गणेशघाट, प्रेम आॕटो जवळ, कल्याण (पश्चिम) येथील अमरधाम येथे करण्यात आला.
कल्याण शिंपी समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री गणेश सावळे, सचिव अरविंद नेरपगार, खजिनदार प्रविण भांडारकर,किशोर बागुल,दत्तात्रय निकुंभ, दत्तात्रय खैरनार, माजी अध्यक्ष सुभाष बाविस्कर, शिंपी समाज सांस्कृतिक विभाग उपप्रमुख रविंद्र नेरपगार, विश्वस्थ विजय नाना बिरारी, रामेश्वर धाडणकर, मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) डॉ. मनिलाल शिंपी,कल्याण डोंबिवली विभागातील शिक्षक बंधू भगिनी,शिवछत्रपती शिक्षक सेनेचे कोकण विभाग अध्यक्ष,श्री.प्रशांत भामरे,अनंत किनगे,जनरल एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मुख्याध्यापक विकास पाटील, जितेंद्र सोनवणे,गायक रतिलाल कोळी,सूत्रसंचालक विनोद शेलकर यांच्याकडून स्व.श्रीमती अनुसयाबाई अमृत भामरे यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, सदगती मिळो व भामरे परिवारास दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात येत आहे.दिनांक २२नोव्हेंबर (शनिवार) रोजी नाशिक येथे रामकुंडावर दशक्रिया विधी करण्यात येणार असून.२५ नोव्हेंबर ( मंगळवार) रोजी गंधमुक्ती,उत्तरकार्य करण्यात येणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *