अमळगावच्या आदर्श विद्यालयात ४३ वर्षांनी उजळला जुन्या मित्रांचा स्नेह मेळावा”
1 min read

अमळगावच्या आदर्श विद्यालयात ४३ वर्षांनी उजळला जुन्या मित्रांचा स्नेह मेळावा”

Loading

अमळगावच्या आदर्श विद्यालयात ४३ वर्षांनी उजळला जुन्या मित्रांचा स्नेह मेळावा”

 

अमळनेर प्रतिनिधी
आदर्श विद्यालय, अमळगाव येथे ४३ वर्षांनंतर आपल्या जुन्या बॅचच्या मित्र-मैत्रिणींचा गेट-टुगेदर कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात आपल्या बॅचचे ५० ते ५५ मित्र-मैत्रिणी उपस्थित होते, तर शाळेच्या अनेक सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदवला. दिवसभरात चाललेला हा स्नेह मेळावा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली, जी इयत्ता ९ वीच्या विद्यार्थिनींनी सादर केली. यानंतर आपल्या बॅचचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, आपले जीवलग मित्र बापूसाहेब नंदू निंबा भोईसाहेब यांनी प्रास्ताविक केले. सुरुवातीला दिवंगत गुरुजन व मित्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सर्व गुरूजनांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित मित्र-मैत्रिणींनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या स्नेह मेळाव्यात उपस्थित गुरूजनांमध्ये बापूसाहेब आय.आर. पाटील, नानासाहेब बी.आर. देसले, आबासाहेब एम.जी. पाटील यांचा समावेश होता. तर माजी विद्यार्थ्यांमध्ये वसंत चौधरी, संजय पाटील, मिना पाटील, भिकाजी पाटील, भाग्यश्री पाटील, M.D. चौधरी, हरिलाल खूनपिंपरे, चंदू पाटील, नंदू भोई, अलकाबाई भोई, स्वाती अमृतकर, सुनंदा पाटील यांनी आपले हृदयस्पर्शी आठवणी सांगितल्या. त्यांनी वर्गातील गमती-जमती, यशामागील गुरुजनांचे योगदान, आई-वडिलांसह सरांचा वाटा या सगळ्या आठवणी प्रेक्षकांसमोर मांडल्या.
हा गेट-टुगेदर कार्यक्रम खऱ्या अर्थाने आगळावेगळा ठरला, कारण ४३ वर्षांपूर्वीच्या इ. १० वी बॅचच्या सर्व मित्रांची एकत्रित भेट ही महाराष्ट्रातली दुर्मिळ घटना असल्याचे सांगितले जात आहे. दिवसभर हा समारंभ संगीत, नृत्य, थट्टा-मस्करी, स्नेहभोजन अशा विविध अंगांनी रंगला. मैत्रिणींचे पती व मित्रांच्या पत्नी देखील उपस्थित होते आणि त्यांनी आपले मनातील भावना मांडल्या, त्यामुळे कार्यक्रम अधिकच आनंदमय झाला. अनेकांनी आपले सुख-दु:ख एकमेकांसोबत शेअर करून मन हलकं केले.
या कार्यक्रमात सर्व मित्रांच्या स्थायी नावासाठी आणि शाळेतील मुली व महिला वर्गासाठी दर्जेदार स्वच्छतागृह उभारण्याचा संकल्प देखील करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे स्कूल कमेटी चेअरमन भाऊसाहेब दिपक संभाजीराव भोसले, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता नंदू निंबा भोईसाहेब, इंजिनिअर संजय देविदास पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला, ज्यांनी वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन केले आणि देणगी देऊन कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शा.र. देशपांडे (भाग शाळा, जळोद) यांनी भूषविले, तर प्रस्तावना, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. संजीव पाटील यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते: आप्पासाहेब एस.एच. देशमुख, भाऊसाहेब सी.जी. पाटील, आबासाहेब व्हि.एन. देसाई, बापूसाहेब आय.आर. पाटील, नानासाहेब बी.आर. देसले, आबासाहेब पी.झेड. नीळ, आबासाहेब व्ही.झेड. महाजन, आबासाहेब एम.जी. पाटील, नानासाहेब एस.बी. पाटील, दादासाहेब शरद पाटील, अण्णासाहेब बी.आर. वारूळे, बापूसाहेब अशोक पाटील, भाऊसाहेब एस.आर. सूर्यवंशी, अण्णासाहेब पी.जे. देवरे आणि इतर गुरूजन.
सन्माननीय अतिथींमध्ये अशोक वाणी (डोंबिवली), सतीश पवार (नाशिक), दिलीप पाटील (डांगरी,) रवींद्र पाटील (माजी सरपंच, हातेड), अशोक पाटील (सात्री) यांच्यासह ताईसो देसले, ताईसो सुरेखा पाटील, ताईसो अलका भोई, ताईसो विजया पाटील, ताईसो रेखा खूनपिंपरे, ताईसो स्वाती अमृतकर यांची विशेष उपस्थिती नोंदवण्यात आली.
या गेट-टुगेदरसाठी मागील वर्षभरापासून मित्र नंदू भोई, चंदू पाटील, गजानन वाणी, राजेंद्र अर्जून पाटील व भिकाजी पाटील यांनी खूप प्रयत्न केले. अनेक अडचणींवर मात करून त्यांनी हा अविस्मरणीय स्नेह मेळावा यशस्वी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *