पाचोरा तालुका स्तरीय ‘मिशन स्कॉलरशिप’ कार्यशाळा उत्साहात संपन्न*  *शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी विकासासाठी महत्वाची – विजय पवार गट शिक्षणाधिकारी पाचोरा यांचे प्रतिपादन*
1 min read

पाचोरा तालुका स्तरीय ‘मिशन स्कॉलरशिप’ कार्यशाळा उत्साहात संपन्न* *शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी विकासासाठी महत्वाची – विजय पवार गट शिक्षणाधिकारी पाचोरा यांचे प्रतिपादन*

Loading

*पाचोरा तालुका स्तरीय ‘मिशन स्कॉलरशिप’ कार्यशाळा उत्साहात संपन्न*

*शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी विकासासाठी महत्वाची – विजय पवार गट शिक्षणाधिकारी पाचोरा यांचे प्रतिपादन*

पाचोरा: पंचायत समिती शिक्षण विभाग पाचोरा तर्फे तालुका स्तरीय मिशन यश स्कॉलरशिप व मिशन नवोदय अंतर्गत इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी सुपर फिफ्टी उपक्रमाबाबत शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालयात आयोजित या कार्यशाळेचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शा पो आ अधीक्षक सरोज गायकवाड होत्या. प्रास्ताविक मध्ये त्यांनी शिष्यवृत्ती चाचण्यांमध्ये गुणवत्तावाढ घडवण्यासाठी तालुक्यात भरीव प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. “प्रश्नसंच, नियमित सराव, विषयवार मार्गदर्शन आणि मार्गदर्शन व्याख्याने याद्वारे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी काटेकोरपणे करता येईल,” असे त्या म्हणाल्या.
या उपक्रमामागील प्रमुख प्रेरणा जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेल्या गुणवत्तावर्धन संकल्पनेतून मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. तालुका शिष्यवृत्ती परीक्षा समन्वयक सुभाष देसले सर व उपशिक्षक प्रशांत जोशी सर यांनी विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रम आराखड्याचे सविस्तर विवरण सादर केले.

 

 

 

 

 

 

 

त्यांनी नवोदय प्रवेश परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा या दोन्हीसाठी अत्यंत उपयुक्त अशा मार्गदर्शन व्याख्यानांचे नियोजन, सराव चाचण्या, शंका–निरसन सत्रे, पालक–विद्यार्थी संवाद, तसेच वेळापत्रकानुसार सराव पद्धती यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी वक्त्यांनी विषयानुसार तयार करण्यात आलेल्या कार्यपत्रिका आणि गुणवर्धन पत्रकांच्या आधारे सातत्याने मार्गदर्शन देण्याची ग्वाही दिली. विद्यार्थ्यांना गुणवत्ताकेंद्रित प्रशिक्षण देऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून देणे हेच या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे,शिक्षकांनी जाणीवपूर्वक नियोजन करुन विद्यार्थी हितासाठी काम करावे असे गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाला केंद्रप्रमुख अनिल पाटील, जितेंद्र पाटील, अभिजित खैरनार, मुख्याध्यापक गजानन सोमवंशी,मुख्याध्यापक किरण पाटील सर, लहू पवार सर तसेच तालुक्यातील शिष्यवृत्ती वर्गाची तयारी करणारे सर्व शिक्षक उपस्थित होते. शेवटी टोणपे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *