अमळनेरच्या विकासाची वाट आता होणार सुकर.. अमळनेर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार प्रा डॉ जयश्री साळुंके (दाभाडे मॅडम)…. सर्व सामान्य जनतेचा सामान्य चेहरा….
![]()
अमळनेरच्या विकासाची वाट आता होणार सुकर..
अमळनेर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार प्रा डॉ जयश्री साळुंके (दाभाडे मॅडम)….
सर्व सामान्य जनतेचा सामान्य चेहरा….
अमळनेर
अमळनेर नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला असून स्वातंत्र्या नंतर पहिल्यांदा अमळनेर नगरपरिषद लोकनियुक्त नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती साठी सर्वसाधारण राखीव जाहीर झाले आहे. या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उच्च शिक्षित, अभ्यासू आणि सामाजिक प्रश्नांची, शहरी समस्यांची जाणीव असलेल्या एकमेव ओरिजनल (मूळ , वैध) जमातीच्या उमेदवार प्रा डॉ जयश्री साळुंके दाभाडे मॅडम यांनी आपली उमेदवारी अपक्ष जाहीर केली आहे. आता पर्यंत गेली 27 वर्षे अमळनेर शहर व तालुक्यातील अनेक प्रश्न, समस्या त्यांनी कौशल्याने मार्गी लावल्या आहेत. अमळनेर मधील गोर गरीब सामान्य जनतेला सतत मदत करून त्यांच्या साठी लढून न्याय मिळवून दिला आहे. यात समाजातील सर्व समाजांच्या प्रश्नांचा समावेश आहे. कोणत्याही पदावर कार्यरत नसताना देखील नगर परिषद हद्दीतील किती तरी समस्या त्यांनी आपला अभ्यास, कायद्यांची जाणीव, सामाजिकतेचे भान या जोरावर सर्व सामान्य जनतेचा आवाज बनून जनतेला मदत केली आहे. निष्कलंक कारकिर्द सुरू असताना अनेक समाज कंटकानी त्यांना मार्गातून हटविण्याचा देखील प्रयत्न केला आहे. परंतु न डगमगता, न घाबरता अत्यंत संयम आणि शांततेत प्रत्येक संकटाचा सामना केला आहे.आज त्यांना आपल्या सर्वांच्या सहकार्याची आणि आशीर्वादाची गरज असून आपली हक्काची ताई आपल्या कामांसाठी योग्य पदावर असणे आवश्यक आहे.
सर्व सामान्य जनतेचा चेहरा, अहोरात्र मदतीला धावून येणाऱ्या एकमेव उच्च शिक्षित, सुसंस्कृत नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार प्रा डॉ जयश्री साळुंके-दाभाडे
अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती साठी जनरल (स्त्री पुरुष) राखीव घोषित झाले आहे.या पार्श्वभूमीवर अमळनेर मधील सर्व सामान्य गरीब जनतेच्या एका हाके वर धावून जाणाऱ्या उच्च शिक्षित सुसंस्कृत, प्रभावी, अभ्यासपूर्ण, कायद्यांची जाणीव माहिती असलेले व्यक्तिमत्व प्रा डॉ जयश्री साळुंके-दाभाडे ह्या पदासाठी अपक्ष उमेदवार आहेत.
गेली 27 वर्षे सामान्य गरीब जनतेच्या प्रश्नांसाठी प्रशासन, अधिकारी राजकीय पुढाऱ्यांशी लढून न्याय मिळवून दिला आहे. सामाजिक कामात अग्रेसर, पत्रकारितेचा सर्वांगीण अनुभव, शैक्षणिक क्षेत्रातील 30 वर्षांचा अनुभव, सर्व सामान्य जनतेशी थेट संवाद व संपर्क, सामाजिक जाणीव, माहेरच अमळनेर असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीशी थेट जवळचे संबंध असलेले व्यक्तिमत्व असून नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार
पदावर नसतानाही शेकडो कामे मार्गी लावून अनेक विषय यशस्वी रित्या हाताळून प्रसंगी दोन पाऊले माघार घेऊन साधारण लाभार्थी आणि प्रशासनात नेहमी दुवा म्हणून कार्यरत राहिलेल्या एकमेव अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवार प्रा डॉ जयश्री साळुंके दाभाडे मॅडम

