गणेशोत्सवानिमित्त सुखांजनी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण शिबिर , गरजू महिलांनी व रुग्णांनी सवलतीच्या दरातील उपचारांचा लाभ घेण्याचे आवाहन
1 min read

गणेशोत्सवानिमित्त सुखांजनी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण शिबिर , गरजू महिलांनी व रुग्णांनी सवलतीच्या दरातील उपचारांचा लाभ घेण्याचे आवाहन

Loading

गणेशोत्सवानिमित्त सुखांजनी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण शिबिर

गरजू महिलांनी व रुग्णांनी सवलतीच्या दरातील उपचारांचा लाभ घेण्याचे आवाहन

अमळनेर प्रतिनिधी : गणेश उत्सवानिमित्त अमळनेर येथील सुखांजनी हॉस्पिटलतर्फे स्त्रीरोग, प्रसूती व वंध्यत्व निवारण तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबिर रेल्वे स्टेशनजवळील सुखांजनी हॉस्पिटल येथे होणार आहे.
शिबिरात महिलांची संपूर्ण मोफत तपासणी, स्त्रीरोग तपासणी, पाळीच्या समस्या, पांढऱ्या पाण्याचा त्रास, वंध्यत्व निवारण तसेच कुटुंब कल्याणाबाबत मोफत सल्ला देण्यात येणार आहे. शिबिरात नोंदणी केलेल्या रुग्णांना विविध उपचार व शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यामध्ये सोनोग्राफी केवळ ४०० रुपये, दुर्बिणीद्वारे गर्भपिशवीचे ऑपरेशन २२ हजार रुपये, दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ८ हजार रुपये, डिलिव्हरी ७ हजार रुपये, सिझेरियन शस्त्रक्रिया १५ हजार रुपये, तर टाक्यांचे गर्भपिशवीचे ऑपरेशन १५ हजार रुपये या सवलतीच्या दरात उपलब्ध असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने कळविले आहे.

तसेच अपेंडिक्स, हर्निया व पित्ताशयाच्या शस्त्रक्रियांसाठी आधुनिक लॅप्रोस्कोपी (दुर्बिणीद्वारे) सुविधा उपलब्ध आहे. हॉस्पिटलमध्ये अद्ययावत ऑपरेशन थिएटर, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया सुविधा, वंध्यत्व निवारण उपचार, सोनोग्राफी, स्पेशल एसी, नॉन-एसी व एक्झिक्युटिव्ह रूम तसेच मेडिक्लेमची सुविधा उपलब्ध आहे.
शिबिरासाठी डॉ. जयेश सुखदेव शिंदे (M.B.B.S., D.G.O. Pune, D.Lap. Kochin), स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन तसेच डॉ. सौ. प्रतिज्ञा जयेश शिंदे (M.B.B.S., D.G.O. Pune), स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ यांचे मार्गदर्शन व उपचार मिळणार आहेत.
शिबिरासाठी दि. ७ सप्टेंबरपासून १९ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार असून अधिक माहितीसाठी ०२५८७-२९९७७६ / मोबा. ९३२५२ ४९७५३ या क्रमांकावर संपर्क साधावा. महिलांनी व सर्व गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुखांजनी हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

टीप : अतिजोखमीच्या रुग्णांना वरील सर्व सेवा उपलब्ध होणार नाहीत. रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनाने राखून ठेवला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *