“ISAR परभणी व ग्रामस्थांच्या सहभागाने आडगाव लासिनाला बालविवाह मुक्त घोषित करण्याचा ठराव”
![]()
“ISAR परभणी व ग्रामस्थांच्या सहभागाने आडगाव लासिनाला बालविवाह मुक्त घोषित करण्याचा ठराव”
यवतमाळ प्रतिनिधी
इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेअरनेस अॅण्ड रिफॉर्म (ISAR), परभणी यांच्या वतीने परभणी जिल्ह्यात दिनांक १६/११/२०२५ ला राबविण्यात आलेल्या १०० दिवसीय ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियान कार्यक्रम मौजे आडगाव लासिना येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.अहिल्याबाई गोड, सरपंच आडगाव लासिना होत्या. प्रमुख उपस्थितीत बबन वैद्य, अध्यक्ष तंटामुक्ती समिती; ज्योती वैद्य, अंगणवाडी सेविका; तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक लक्ष्मण गायकवाड, जिल्हा समन्वयक – इसार संस्था,परभणी. रेखा कांबळे, फील्ड ऑफिसर इसार संस्था, परभणी उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, माजी सरपंच, माजी सदस्य, युवक व गावातील सर्व नागरिकांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. शिक्षक ज्ञानेश्वर वैद्य यांनी तसेच लक्ष्मण गायकवाड यांनी बालविवाह विषयक सखोल मार्गदर्शन करत बालविवाह निर्मूलनासाठी गावाच्या सामूहिक बांधिलकीवर भर दिला. सभेदरम्यान ‘बालविवाह मुक्त आडगाव लासिना’ करण्याचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्याचे ठरविण्यात आले. आणि हा ठराव जिल्हाधिकारी, परभणी यांना सादर करून गावात व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. संपूर्ण गावाने एकत्र येऊन बालविवाह निर्मूलनासाठी सातत्यपूर्ण आणि प्रभावी उपक्रम हाती घेण्याचे ठरवत सामाजिक परिवर्तनाची दिशा ठामपणे निश्चित केली.

