वारकरी संप्रदायाचा अनन्य भक्त, 93 वर्षीय ह.भ.प. भानुदास पाटील यांचे निधन”, उद्या सकाळी दहिवद येथे दहा वाजता निघणार अंत्ययात्रा
![]()
“वारकरी संप्रदायाचा अनन्य भक्त, 93 वर्षीय ह.भ.प. भानुदास पाटील यांचे निधन”
उद्या सकाळी दहिवद येथे दहा वाजता निघणार अंत्ययात्रा
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
आज सकाळी 11 वाजता वारकरी संप्रदायाचे निस्सीम भक्त, पांडुरंगाचे अखंड उपासक ह.भ.प. भानुदास मोतीराम पाटील (भदाणे) वय 93 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अत्यंत साधेपणा, कुटुंबवत्सल स्वभाव आणि अध्यात्मिक जीवनामुळे परिसरात त्यांचा मोठा लौकिक होता.
ADI म्हणून निवृत्त झालेल्या पाटील यांनी आयुष्यभर इमानदारीने सेवा केली. कोणतीही वारी न चुकवणारे, वारकरी परंपरेचे कठोर पालन करणारे आणि पांडुरंगभक्तीत अखंड लीन राहणारे म्हणून ते सर्वांच्या आदराचे केंद्रबिंदू बनले होते. अतिथीसत्कारात आनंद मानणारे, साध्या स्वभावाचे आणि प्रेमळ मनाचे व्यक्तिमत्त्व ही त्यांची खरी ओळख होती.
मागे त्यांचा मुलगी–मुले, सुना, नातवंडे आणि पणतवंडे असा मोठा, सुशिक्षित तसेच शासकीय सेवेत कार्यरत गोतावळा आहे. परिवार, नातेवाईक, भदाणे ग्रामस्थ आणि वारकरी समुदायात त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांचे अंत्यसंस्कार दि. 19 नोव्हेंबर 2025 रोजी (बुधवार) सकाळी 10.00 वाजता दहीवद, ता. अमळनेर येथील राहत्या घरी होतील.
जळगाव ग.स. सोसायटीचे माजी व्हॉइस चेअरमन श्यामकांत भदाणे, तसेच वत्साई एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत भदाणे व शशिकांत भदाणे यांचे ते वडील होत.
परिसरातील अध्यात्मिक जगतातील एक प्रकाशवाट आज हरपली…

