कालिदास कलश सोहळ्यात विजयी कामगिरी—महाकाल नगरीत महाराष्ट्राची स्वर्गसुख अनुभूती!
![]()
कालिदास कलश सोहळ्यात विजयी कामगिरी—महाकाल नगरीत महाराष्ट्राची स्वर्गसुख अनुभूती!
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
31 ऑक्टोबर 2025 रोजी महाकाल नगरी उज्जैन येथे झालेल्या कालिदास कलश सोहळ्यात अंमळनेरच्या महाराष्ट्राच्या थाटामाटात सादर केलेल्या श्री नारायणी गृप महीला मंडळ
भव्य थीम परफॉर्मन्सने उपस्थितांच्या मनावर राज्य केले. देव पाहावं म्हणून गेलेल्या या सर्व महिलांना प्रत्यक्ष देवत्वाची आणि स्वर्गसुखाची अनुभूती लाभली. उज्जैनमध्ये साकारण्यात आलेली ‘महाराष्ट्र थीम’ आणि ‘खान्देशचा ग्रुप’ हे विशेष आकर्षण ठरले. जेष्ठ महिलांबरोबरच तरुणींनीही उत्साहाने सहभाग घेत अंमळनेरचा ठसा उमटवला. विठ्ठल–भावना पाटील, रखुमाई–सीमा पाटील, माँ जिजाऊ–रजनी पाटील, बाल शिवबा–तनिष्ण पाटील, वासुदेव–कल्पना पाटील, जोतिबा–सुदर्शना पाटील, सावित्रीबाई–पूजा पाटील, डॉ. आनंदिबाई जोशी–ज्ञानेश्वरी पाटील, झाशीची राणी–मेघा पाटील व महाराष्ट्रीयन स्त्री–मालती पाटील यांनी आपल्या भूमिका इतक्या उत्कटतेने साकारल्या की प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत भरभरून दाद दिली आणि मंडळास भरघोस बक्षिसांनी गौरवण्यात आले. संपूर्ण उपक्रमात अंमळनेर आणि कल्पना पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सोहळ्याचा एक भाग म्हणून 20 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली होती, ज्यात अंमळनेरच्या महीलांनी खास खान्देश वैभवाने सजवलेली भव्य बैलगाडी उज्जैनच्या रस्त्यांवर आकर्षणाचे केंद्र ठरली. पदयात्रेदरम्यान महाकालाच्या कृपेप्रमाणे क्विंटलने फुलवर्षाव होत होता आणि या सन्मानाने संपूर्ण मंडळ भारावून गेले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि स्त्रीशक्तीचा असा अद्वितीय ठसा महाकाल नगरीत उमटल्याने अंमळनेरचा मान अभिमानाने अधिक उंचावला आहे.

