प्रभाग १६ मध्ये जनतेचा निर्धार — ‘रवी पाटील हवेच!’ निवडणुकीची हवा एकाच दिशेने”
1 min read

प्रभाग १६ मध्ये जनतेचा निर्धार — ‘रवी पाटील हवेच!’ निवडणुकीची हवा एकाच दिशेने”

Loading

प्रभाग १६ मध्ये जनतेचा निर्धार — ‘रवी पाटील हवेच!’ निवडणुकीची हवा एकाच दिशेने”

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) :

अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ जवळ येत असताना प्रभाग क्रमांक १६ मध्ये राजकीय समीकरणांना नवे वळण देणारी घडामोड घडली आहे. समाजसेवेचा ठसा, लोकाभिमुख धोरणे आणि जनतेचा निर्विवाद विश्वास मिळवलेले श्री. विश्वनाथ (रवी) पिंताबर पाटील यांनी उमेदवारीची घोषणा केल्याने प्रभागात सकारात्मकता आणि उत्साहाचे नवे वारं वाहू लागले आहेत.
रवी पाटील यांचे समाजकारणातील मूल्याधिष्ठित संस्कार घरातूनच रुजले. त्यांच्या वडिलांनी — कै. पितांबर तात्या पाटील — प्रभागातील प्रत्येक प्रश्नाला स्वतःहून भिडून, निस्वार्थीपणे काम करून आजीवन लोकसेवा केली. याच वारशातून निर्माण झालेला जनविश्वास आज रवी पाटील यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे.
२०११ साली नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाचा मान राखत रवी पाटील यांनी नगरपालिकेच्या कामकाजात सजग, प्रामाणिक आणि परिणामकारक भूमिका बजावली. प्रभागात पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणा, स्वच्छता मोहीम, रस्ते-दुरुस्ती, प्रकाशयोजनांचा विस्तार, तसेच लोकांच्या सरकारी कामात तातडीचे मार्गदर्शन — या सर्व क्षेत्रांत त्यांनी ठोस कामगिरी करून विकासाची नवी दिशा दिली.
त्यांची “हातोडी पद्धतीची कार्यशैली” आणि “समस्या कोणतीही असो… उपाय रवी पाटील कडेच!” ही ओळख आज प्रभागात जनतेच्या तोंडी आहे.
नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ मध्ये एकाच गोष्टीची चर्चा जोर धरू लागली आहे —
“योग्य उमेदवार कोण? तर फक्त रवी पाटील!”

व्हॉट्सअँप ग्रुप्सपासून सोशल मीडियापर्यंत तरुणाईने स्पष्ट संदेश दिला आहे —
“आमचा नगरसेवक एकच — रवी पाटील!”
त्यांच्या विनम्र स्वभावामुळे, सर्व स्तरांशी सुसंवादामुळे, आणि कधीही उपलब्ध राहण्याच्या वृत्तीमुळे महिला, युवक ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यांना मोठा जनसमर्थन लाभत आहे.
 पत्रकार ईश्वर महाजन यांच्याशी बोलतांना रवी पाटील यांनी भावनिक शब्दांत प्रतिक्रिया दिली —
“मी प्रतिनिधी नाही, मी जनसेवक आहे. आपण आशीर्वाद दिलात तर प्रभागाचा विकास हा माझा संकल्प आहे.”
प्रभागातील वातावरण पाहता नागरिकांमध्ये एकच घोषवाक्य जोर धरताना दिसत आहे —
“पक्ष कोणताही असो… आमचा नगरसेवक मात्र रवी पाटील!”
हाच जनतेचा संदेश आगामी निवडणुकीत प्रभाग १६ मधील राजकीय समीकरणे निश्चितच बदलू शकतो…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *