समृद्ध पंचायतराज अभियान मेळाव्यात मान्यवरांचा भव्य सत्कार; आष्टी (बीड) येथे संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद”
1 min read

समृद्ध पंचायतराज अभियान मेळाव्यात मान्यवरांचा भव्य सत्कार; आष्टी (बीड) येथे संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद”

Loading

“समृद्ध पंचायतराज अभियान मेळाव्यात मान्यवरांचा भव्य सत्कार; आष्टी (बीड) येथे संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद”

अमळनेर प्रतिनिधी – (ईश्वर महाजन)

शिवतीर्थ, आष्टी (जि. बीड) येथे आयोजित समृद्ध पंचायतराज अभियान संवाद मेळावा भव्य उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ग्रामविकास मंत्री मा.ना. जयकुमार गोरे साहेबांनी उपस्थित राहून मेळाव्याचे औपचारिक उद्घाटन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद सभापती मा.ना. प्रा. राम शिंदे साहेब तसेच खासदार मा. बजरंग सोनवणे यांनी सहभाग नोंदवला. तर या संवाद मेळाव्याचे अध्यक्षस्थान मा.ना. आमदार सुरेश आण्णा धस यांनी भूषविले.
मेळाव्याच्या निमित्ताने सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने सर्व मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष दत्ता भाऊ काकडे यांनी केले. यावेळी राज्य कोअर कमिटीचे आबासाहेब सोनवणे, टेमगिरे साहेब, राजाराम पोतणीस साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका व माजी लोकनियुक्त सरपंच सौ. सुषमाताई देसले, सौ. निकिता रानवडे, सौ. सुनीताताई तायडे, श्री राजमल भाऊ भागवत, श्री बाळूभाऊ धुमाळ, श्री समाधान बोडके तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांवर, ग्रामविकासाच्या सर्वसमावेशक धोरणांवर आणि गावपातळीवरील प्रगत योजना राबविण्यासाठी स्थानिक प्रतिनिधींनी केलेल्या कामांचे कौतुक या मेळाव्यातून व्यक्त करण्यात आले.
मान्यवरांची भव्य उपस्थिती, उत्साही कार्यकर्ते आणि ग्रामपातळीवरील प्रतिनिधींचा मोठा प्रतिसाद यामुळे हा संवाद मेळावा अत्यंत यशस्वी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *