अमळनेरमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी मोफत टेस्ट सिरीज सुरू; तरुणांना मोठा फायदा पोलीस भरतीपूर्व सराव चाचणी स्पर्धेत मोहन पाटील प्रथम
![]()
अमळनेरमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी मोफत टेस्ट सिरीज सुरू; तरुणांना मोठा फायदा
पोलीस भरतीपूर्व सराव चाचणी स्पर्धेत मोहन पाटील प्रथम
अमळनेर प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रभर तरुण पोलीस भरतीकरीता शारिरीक चाचणीसाठी जोरदार तयारी करीत आहेत शारिरीक चाचणीसोबत लेखी परीक्षेची सुद्धा उत्तम तयारी व्हावी या पार्श्वभूमीवर तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून आदिवासी विकास विभाग नाशिक येथील सह आयुक्त कपिल पवार यांच्या संकल्पनेतून
राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी पुणे,पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र अमळनेर व पातोंडा परिसर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस भरती, तलाठी भरती व इतरही परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी दर रविवारी मोफत व दर्जेदार टेस्ट सिरीजचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रथम क्रमांक मिळवा व बक्षीस मिळवा या उपक्रमांतर्गत दर रविवारी एक टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीपूर्व तयारीसाठी एकूण वीस दर्जेदार सराव चाचण्या घेण्यात येणार आहेत. तरुणांना टेस्ट सोडवल्यानंतर लगेच बक्षीस देण्यात येते. रविवारी घेण्यात आलेल्या पहिल्या सराव चाचणीत खेडीरामेश्वर येथील पोलीस भरतीची तयारी करणारे मोहन मखमल पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्द्ल आयोजकांतर्फे त्यांना गोळाफेक तयारीसाठी गोळा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व्ही एन ब्राह्मणकर तसेच परीक्षक म्हणून शिक्षक किशोर पाटील, दिनेश निघोट व किशोर पाटील यांनी काम पाहिले.
तरुणांना टेस्ट सिरीज सोबत तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शनही लाभणार आहे. जास्तीत जास्त तरुणांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

