समृद्ध पंचायतराज अभियान मेळाव्यात मान्यवरांचा सत्कार; आष्टी (बीड) येथे भव्य उत्साहात कार्यक्रम संपन्न”
1 min read

समृद्ध पंचायतराज अभियान मेळाव्यात मान्यवरांचा सत्कार; आष्टी (बीड) येथे भव्य उत्साहात कार्यक्रम संपन्न”

Loading

“समृद्ध पंचायतराज अभियान मेळाव्यात मान्यवरांचा सत्कार; आष्टी (बीड) येथे भव्य उत्साहात कार्यक्रम संपन्न”

अमळनेर प्रतिनिधी – ईश्वर महाजन

आष्टी (बीड) येथे आयोजित समृद्ध पंचायतराज अभियान संवाद मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ग्रामविकास मंत्री मा.ना. श्री जयकुमार गोरे साहेब उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद सभापती मा.ना. प्रा. राम शिंदे साहेब तसेच खासदार मा. बजरंग सोनवणे यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.ना. आमदार सुरेश आण्णा धस यांनी भूषविले. प्रदेशाध्यक्ष दत्ता भाऊ काकडे, राज्य कोअर कमिटीचे आबासाहेब सोनवणे, टेमगिरे साहेब, सौ. सुषमाताई देसले, निकिता रानवडे, सुनीताताई तायडे, राजमल भागवत, बाळू धुमाळ, समाधान बोडके आदी मान्यवरांना सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.

मेळाव्यात पंचायतराज व्यवस्थेतील विकास, गावपातळीवरील प्रकल्पांची अंमलबजावणी, तसेच राज्यातील प्रगतीशील ग्रामविकास मॉडेल या विषयांवर सखोल चर्चा झाली. उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे हा संवाद मेळावा खास ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *