व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ. वर्षा सोहिते यांस “Best Principal Award” ,   डॉ. किरण बेदी आणि सायना नेहवाल यांच्या हस्ते सन्मानित
1 min read

व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ. वर्षा सोहिते यांस “Best Principal Award” , डॉ. किरण बेदी आणि सायना नेहवाल यांच्या हस्ते सन्मानित

Loading

व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ. वर्षा सोहिते यांस “Best Principal Award”

प्रमुख पाहुणे डॉ. किरण बेदी आणि सायना नेहवाल यांच्या हस्ते सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी
दुर्गा फाउंडेशन संचलित कै.श्री. दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल आनंदाचा सण साजरा करत आहे!!
शाळेतील आदरणीय प्राचार्या सौ.वर्षा सोहिते यांना इंडियन टॅलेंट ओलंपियाड तर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्यात *Best Principal Award 2025-26* (The Lifetime Achievement Award )ने सन्मानित करण्यात आले आहे. मुख्य आकर्षणाची आणि महत्त्वाची बाब म्हणजे हा पुरस्कार त्यांना देशातील दोन दिग्गज व प्रतिष्ठित महिला म्हणजेच *माननीय डॉ. किरण बेदी* ( India’s first Woman IPS Officer, Renowened Reformer, Inspirational Leader,Former Lieutenant Governor of Puducherry )
तसेच *बॅटमिंटनपटू माननीय सायना नेहवाल*( Olympic Champion, Padmabhushan Awardee, Badminton Icon) यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. ही एक खूप अभिमानास्पद व कौतुकास्पद बाब आहे.
हा पुरस्कार त्यांचे नेतृत्व, संघटनात्मक कौशल्य, जबाबदाऱ्याची जाणीव, विद्यार्थ्यांविषयी सहानुभूती, शिस्तबद्धता या गुणांची दखल घेतो. ITO ने शिक्षणातील उत्कृष्ट योगदानाचे कौतुक करण्यासाठी देशभरातील नामवंत व प्रभावशाली मुख्याध्यापक व प्रमुख शिक्षक यांना एकत्र आणले.
या सन्मानामुळे शाळेतील सर्व शिक्षक,विद्यार्थी व पालकांमध्ये वातावरण आहे. मुख्याध्यापिका वर्षा सोहिते यांनी त्यांच्या कार्याची दखल केल्याबद्दल आयोजकांच्या आभार मानले. आणि हे यश शाळेतील सर्व शिक्षक विशेष करून ITO Coordinator मनीषा सोनार सर्व सहभागी विद्यार्थी, संस्थेचे चेअरमन मा. उत्कर्ष पवार, सचिव सौ. अलका पवार तसेच कुटुंबातील व्यक्ती या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच शक्य झाले असल्याचे सांगितले. या सर्वांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हा पुरस्कार केवळ प्राचार्या वर्षा सोहिते याच्या अपवादात्मक प्रयत्नाचे नव्हे तर व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या दृष्टिकोनाचेही प्रतीक आहे. एक चांगले जग निर्माण करण्यासाठी तयार असलेल्या आनंदी, सक्षम आणि सहानुभूतीशील विद्यार्थ्यांचे संगोपन करण्याचा प्रयत्न करणारा दृष्टिकोन.
हा पुरस्कार प्राचार्यांच्या नेतृत्वाची आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याची पोचपावती आहे. यामुळे शाळेच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *