सिंदूर लागवडीचा यशस्वी प्रयोग – फक्त १५ महिन्यात उत्पादन!  कृषीभूषण मा.आमदार साहेबराव पाटील
1 min read

सिंदूर लागवडीचा यशस्वी प्रयोग – फक्त १५ महिन्यात उत्पादन! कृषीभूषण मा.आमदार साहेबराव पाटील

Loading

सिंदूर लागवडीचा यशस्वी प्रयोग – फक्त १५ महिन्यात उत्पादन!

कृषीभूषण मा.आमदार साहेबराव पाटील

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
राजवड (ता. अमळनेर) येथील “राज फॉर्म” वर कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी सिद्ध केलेली कृषीतील नवी कामगिरी आज संपूर्ण जिल्ह्यात आदर्श ठरत आहे.
१५ ऑगस्ट २०२३ रोजी या फॉर्मवर ‘सिंदूर’ या मौल्यवान पिकाची लागवड करण्यात आली. सामान्यतः सिंदूर पिकाचा उत्पादन कालावधी तब्बल तीन वर्षांचा असतो. शेतकरी लागवड करून दीर्घ प्रतीक्षा केल्यानंतरच पहिला हंगाम मिळतो. परंतु कृषिभूषण माजी आमदार साहेबराव पाटील यांनी शास्त्रशुद्ध नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व सातत्यपूर्ण देखरेख यांच्या जोरावर अवघ्या १५ महिन्यातच पहिला हंगाम यशस्वीरीत्या घेतला आहे.
हा प्रयोग केवळ धाडसी नव्हे तर कृषी क्षेत्रातील अभिनव संशोधनाचे उदाहरण ठरत असून तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक ठरत आहे.
दुसऱ्या हंगामाची पाहणी करताना साहेबराव पाटील यांनी सांगितले की—
➤ योग्य अंतरावर लागवड,
➤ सेंद्रिय खतांचा नियोजित वापर,
➤ पाणी व्यवस्थापनावर विशेष लक्ष,
➤ कीड व्यवस्थापनातील कार्यक्षम पद्धती
यामुळे सिंदूर पिकाची वाढ अनुकूल झाली आणि उत्पादन कालावधी ३ वर्षांवरून १५ महिन्यांवर आणण्यात यश आले.
शेतकरी बांधवांनी पाटील यांची ही कामगिरी पाहून समाधान व्यक्त केले असून, अशा धाडसी प्रयोगांचे अनुकरण करण्याची उत्सुकता सर्वत्र वाढली आहे. कृषी विभागातील अधिकारी देखील या प्रयोगाचे कौतुक करत असून हा मॉडेल इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अमळनेर तालुक्यातील कृषी क्षेत्रात साहेबराव पाटील यांनी केलेली ही कामगिरी उत्साहवर्धक व भविष्यकालीन शेतीला नवे वळण देणारी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *