आर.सी.पटेल आयएमआरडी बी.सी.ए ,बी.बी.ए व बी.एम.एस. चे १० विदयार्थी विदयापीठ गुणवत्ता यादीत
![]()
आर.सी.पटेल आयएमआरडी बी.सी.ए ,बी.बी.ए व बी.एम.एस. चे १० विदयार्थी विदयापीठ गुणवत्ता यादीत
शिरपूर प्रतिनिधी:
वेदांत माळी
गौरव पाटील
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगाव यांनी माहे. एप्रिल/ मे २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षामधील गुणवत्ता यादी जाहीर केली. त्यामध्ये आर.सी.पटेल आय.एम.आर.डी परिसंस्थेतील बी.सी.ए., बी.बी.ए., व बी.एम.एस एकुण १० विदयार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत परिसंस्थेची परंपरा कायम राखली. आय.एम.आर.डी. परिसंस्थेतील विदयार्थी विविध अभ्यासक्रमात सतत गुणवत्ता यादीत चमकतात.
बी.सी.ए. अंतीम वर्षामधुन परीसंस्थेतील पाटील संजना मनोहर हिने ९.९० सी.जी.पी.ए सह ओ ग्रेड (एकूण गुण ३७४० /४२००) मिळवुन विदयापीठात द्वितीय क्रमांक तसेच अहिरे वैभव राकेश याने ९.८६ सी.जी.पी.ए सह ओ ग्रेड (एकूण गुण ३७८४ /४२००) मिळवुन विदयापीठात तृतीय क्रमांक तसेच पाटील कामिनी छोटू हिने ९. ८६ सी.जी.पी.ए सह ओ ग्रेड (एकूण गुण ३७६३ /४२००) मिळवुन विदयापीठात चतुर्थ क्रमांक व पटेल ख़ुशी सतीश हिने ९. ८६ सी.जी.पी.ए सह ओ ग्रेड (एकूण गुण ३७५०/४२००) मिळवुन विदयापीठात पाचवा क्रमांक मिळवत परिसंस्थेचे नाव उज्वल केले.
बी.बी.ए. अंतीम वर्षामधुन परीसंस्थेतील वर्मा सोनिया मनोज हिने ९ .६५ सी.जी.पी.ए सह ओ ग्रेड (एकूण गुण ३७८४/४३००) मिळवुन विदयापीठात प्रथम क्रमांक तसेच राठोड नक्षत्रा नितीन हिने ९.५१ सी.जी.पी.ए सह ओ ग्रेड (एकूण गुण ३६७६/४३००) मिळवुन विदयापीठात द्वितीय क्रमांक तसेच पाटील अश्विनी कन्हैया हिने ९. ४६ सी.जी.पी.ए सह ए+ ग्रेड (एकूण गुण ३६२७/४३००) मिळवुन विदयापीठात तृतीय क्रमांक मिळवत परिसंस्थेचे नाव उज्वल केले.
बी.एम.एस अंतीम वर्षामधुन परीसंस्थेतील पवार रोशनी सुनील हिने ९.४१ सी.जी.पी.ए सह ए+ ग्रेड (एकूण गुण ३४७१/४३००) मिळवुन विदयापीठात प्रथम क्रमांक तसेच राजपूत दर्शना मुलसिंग याने ९.३६ सी.जी.पी.ए सह ए+ ग्रेड (एकूण गुण ३४५०/४३००) मिळवुन विदयापीठात द्वितीय क्रमांक तसेच जैन अभिषेक योगेश याने ९.३४ सी.जी.पी.ए सह ए+ ग्रेड (एकूण गुण ३४३९/४३००)मिळवुन विदयापीठात तृतीय क्रमांक मिळवत परिसंस्थेचे नाव उज्वल केले
विदयार्थी हे नेहमी चांगल्या गुणांनी यशस्वी व्हावे व चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट मिळावे असा माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल यांचा मानस असतो व त्यासाठी परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांच्या नेहमी मिळणा-या मार्गदर्शनामुळे विदयार्थी हे घवघवीत यश संपादन करत असतात.विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विभागप्रमुख व प्राध्यापकांचे मोलाचे योगदान मिळत असते.
यांच्या यशाबददल माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट चे अध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतन भाई पटेल, सचिव राजगोपालजी भंडारी, परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील, एम.सी.ए. विभागप्रमुख डॉ.मनोज बेहेरे, आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. मनोज पटेल, पदवी विभागप्रमुख डॉ. तुषार पटेल यांनी कौतुक केले.
प्रा. दिनेश बोरसे, प्रा. सचिन सुराणा, डॉ. अमर गौर, डॉ. योगेश सेठिया, प्रा. केदार आपटे, प्रा. महेश भावसार, डॉ.प्रियंका भंडारी, डॉ. लक्ष्मीकांत शर्मा, प्रा. सुफियान बागवान, प्रा. प्रियंका सैंदाणे, प्रा. विजय गर्गे, प्रा. कौस्तुभ सावंत, प्रा. मिलिंद पाटील, डॉ. रुपाली अग्रवाल, प्रा. किर्तीका बेहरे, प्रा. विजेता सोनगीरे, प्रा. ज्योत्सना माळी , प्रा. सुवर्णा चौधरी , प्रा. मृणाल बिडकर ,डॉ . आशा पाटील , प्रा. वैष्णवी सूर्यवंशी , प्रा. ज्योती गोराणे ,प्रा. तृप्ती चौधरी, प्रा. पूनम मंडलिक या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले, तसेच राजिस्ट्रार प्रा. सुमित सगळे, श्री. डी.यु. चौधरी, श्री. विशाल माहेश्वरी, सौ. कविता पाटील, सौ. निलिमा पाटील, , श्री. धिरज शेटे, श्री. दिपक बोरसे, श्री. किशोर सोनवणे, श्री. दिपक दोरीक श्री. सचिन नवले यांनी अभिनंदन केले.

