खान्देशात सुरेल अल्हादाची मेजवानी; अमळनेरमध्ये पंडित विवेक सोनार यांच्या मार्गदर्शनात बासरी वादन कार्यशाळा”
1 min read

खान्देशात सुरेल अल्हादाची मेजवानी; अमळनेरमध्ये पंडित विवेक सोनार यांच्या मार्गदर्शनात बासरी वादन कार्यशाळा”

Loading

“खान्देशात सुरेल अल्हादाची मेजवानी; अमळनेरमध्ये पंडित विवेक सोनार यांच्या मार्गदर्शनात बासरी वादन कार्यशाळा”

अमळनेर प्रतिनिधी — साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने समाज प्रबोधनाबरोबरच कला, संगीत आणि संस्कृतीची जपणूक करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जातात. या सांस्कृतिक परंपरेला पुढे नेत शनिवार, दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी एक दिवसीय बासरी वादन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे सुप्रसिद्ध शिष्य व आंतरराष्ट्रीय स्तरावरील बासरीवादक पंडित विवेक सोनार (मुंबई) यांचे थेट मार्गदर्शन लाभणार आहे.

खान्देशातील कला, संगीत, नाट्य आणि विविध कलागुणांची जोपासना व्हावी, रसिक वर्ग तयार व्हावा तसेच कलावंतांना सक्षम मंच मिळावा या हेतूने प्रतिष्ठान सातत्याने उपक्रम राबवत असते. संगीत ही मनाला शांतता देणारी आणि बासरीची धून तर आत्म्यालाच स्पर्श करणारी कला आहे. हा आनंद सर्वांना अनुभवता यावा, तसेच बासरी वादनाचे प्रशिक्षण अधिक प्रभावी पद्धतीने मिळावे म्हणून सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत बासरी वादनाचा रियाज, रागदारीची ओळख, तालाचा सराव तसेच बासरी वादनातील विशेष तंत्राबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

ही कार्यशाळा साने गुरुजी कर्मभूमी स्मारक, गलवाडे रस्ता, अमळनेर येथे होणार असून सहभागासाठी 9421702841 या क्रमांकावर नोंदणी करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ही कार्यशाळा पूर्णतः नि:शुल्क आहे. या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरविंद सराफ, कार्यवाह दर्शना पवार, तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *