अमळनेर येथील उमेश काटे यांना ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट तालुकाध्यक्ष पुरस्कार’ जाहीर
1 min read

अमळनेर येथील उमेश काटे यांना ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट तालुकाध्यक्ष पुरस्कार’ जाहीर

Loading

अमळनेर येथील उमेश काटे यांना ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट तालुकाध्यक्ष पुरस्कार’ जाहीर

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर – येथील ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे तालुकाध्यक्ष उमेश प्रतापराव काटे यांना काल ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट तालुकाध्यक्ष पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. व्हाईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने राज्यातील केवळ पाच तालुकाध्यक्षांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. अमळनेर येथे संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, उत्कृष्ट गणेश मंडळाचा सन्मान, विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असून नुकतेच संघटनेचे ‘राज्यस्तरीय केडर कॅम्प’ यशस्वीरित्या पूर्ण केला. या सर्व कामाची दखल घेत राज्यस्तरीय निवड समितीने नाशिक विभागातून उमेश काटे यांची राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट तालुकाध्यक्ष’ पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यांना 15 व 16 नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या अधिवेशनात संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, महासचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश सरचिटणीस डॉ.डिगंबर महाले यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. काटे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल नाशिक विभागीय अध्यक्ष मिलिंद टोके, जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले, जिल्हा उपाध्यक्ष उमेश धनराळे, जिल्हा संघटक जयेशकुमार काटे, जिल्हा मीडिया प्रमुख बापूराव ठाकरे यांच्यासह जिल्हा व तालुका कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *