विकासाच्या दिंडीसाठी सज्ज अमळनेर — सौ. स्वप्ना विक्रांत पाटील उद्या उमेदवारी अर्ज सादर करणार!” अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 : प्रभाग क्र. 17 अ मध्ये नव्या परिवर्तनाचा ध्वज फडकणार!
![]()
“विकासाच्या दिंडीसाठी सज्ज अमळनेर — सौ. स्वप्ना विक्रांत पाटील उद्या उमेदवारी अर्ज सादर करणार!”
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 : प्रभाग क्र. 17 अ मध्ये नव्या परिवर्तनाचा ध्वज फडकणार!
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन):
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण रंगू लागले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्य आणि लोकसेवा यासाठी प्रसिद्ध असलेले माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील व त्यांची पत्नी सौ. स्वप्ना विक्रांत पाटील हे दाम्पत्य पुन्हा एकदा प्रभागातील जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या दाम्पत्याने सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय उपक्रम राबवले असून, नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल विश्वास, आपुलकी आणि आदराचे नाते दृढ झाले आहे. विशेषतः प्रभाग क्र. 17 अ मध्ये नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तातडीने तोडगा काढण्यात या दाम्पत्याने विशेष ओळख निर्माण केली आहे.
शनिवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता, सौ. स्वप्ना विक्रांत पाटील या आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. या निमित्ताने प्रभाग क्र. 17 अ मध्ये ‘विकासाच्या दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या श्रीकृष्णपुरा, वडचौक, अमळनेर येथील निवासस्थानापासून होईल आणि अमळनेर नगरपरिषद कार्यालयात अर्ज सादर करून समारोप करण्यात येईल.
माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांनी आवाहन केले आहे —
“ही केवळ उमेदवारी नाही, तर प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प आहे. त्यामुळे प्रभागातील सर्व बांधव-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे.”
या कार्यक्रमासाठी शहरातील महिला मंडळे, युवक कार्यकर्ते, नागरिक व सामाजिक संघटना मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण अमळनेर शहरात सध्या या ‘विकासाच्या दिंडी’बद्दल आणि सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांच्या उमेदवारीबद्दल उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

