अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : रवि पाटील दाम्पत्याची अपक्ष व शहर विकास आघाडीमार्फत उमेदवारी दाखल
1 min read

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : रवि पाटील दाम्पत्याची अपक्ष व शहर विकास आघाडीमार्फत उमेदवारी दाखल

Loading

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : रवि पाटील दाम्पत्याची अपक्ष व शहर विकास आघाडीमार्फत उमेदवारी दाखल

प्रभाग 16 मध्ये नवा उत्साह! पाटील विश्वनाथ (रवि) आणि निलिमा पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्र. 16 (अ) आणि 16 (ब) मध्ये राजकीय वातावरण रंगतदार बनले आहे. विद्येश्वर महादेव तसेच नागरिकांच्या आशीर्वादाने पाटील विश्वनाथ (रवि) पितांबर यांनी प्रभाग क्र. 16 “अ” (OBC) मधून आणि पाटील निलिमा विश्वनाथ (रवि) यांनी प्रभाग क्र. 16 “ब” (महिला राखीव) मधून आपला अपक्ष तसेच शहर विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज (फॉर्म) दाखल केला आहे.
या उमेदवारी दाखल कार्यक्रमास मा. नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील, महेश पाटील, कल्पेश साळूंखे, विवेक पाटील, यश अहिरे आणि मयूर पाटील उपस्थित होते. दोन्ही प्रभागातील नागरिकांमध्ये या दाम्पत्याच्या उमेदवारीची चर्चा रंगली असून, “सामाजिक कार्य, साधेपणा आणि जनतेशी जिव्हाळ्याचा संपर्क” हेच त्यांचे बलस्थान असल्याचे बोलले जात आहे.
प्रभाग क्र. 16 मधील मतदारांशी सातत्याने संवाद साधत नागरिकांच्या अडचणींवर तोडगा काढणाऱ्या पाटील विश्वनाथ (रवि) यांच्या उमेदवारीने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर महिला मतदारसंघातून निलिमा पाटील यांच्या प्रवेशामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *