अमळनेर-नंदुरबारसाठी ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून माजी आमदार कार्यसम्राट शिरीषदादा चौधरी यांची निवड — शिवसैनिकांत आनंदाची लाट!
1 min read

अमळनेर-नंदुरबारसाठी ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून माजी आमदार कार्यसम्राट शिरीषदादा चौधरी यांची निवड — शिवसैनिकांत आनंदाची लाट!

Loading

अमळनेर-नंदुरबारसाठी ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून माजी आमदार कार्यसम्राट शिरीषदादा चौधरी यांची निवड — शिवसैनिकांत आनंदाची लाट!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
वंदनीय हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने आणि शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अमळनेर व नंदुरबार जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून कार्यसम्राट माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल हिरा उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र चौधरी, शिरीष दादा मित्र परिवारातील सर्व माजी नगरसेवक, सर्व नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी करणारे भावी नगरसेवक,मित्रपरिवार,
अमळनेर तालुकाप्रमुख सुरेश पाटील तसेच शिवसेना (शिंदे गट) चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकांनी शिरीषदादा चौधरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष निश्चितपणे भक्कम यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अमळनेर-नंदुरबार परिसरात नवचैतन्य संचारले आहे.
“शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि शिरीषदादांच्या मार्गदर्शनात शिवसेना पुन्हा जनतेच्या मनात घर करेल!” — असे कार्यकर्त्यांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *