महात्मा फुले हायस्कूल मध्ये जनजाती गौरव पंधरवाडा अंतर्गत वारली चित्रकला स्पर्धा !… लहान गटात संगीता बारेला तर मोठ्या गटात मयुरी भोई प्रथम
![]()
महात्मा फुले हायस्कूल मध्ये जनजाती गौरव पंधरवाडा अंतर्गत वारली चित्रकला स्पर्धा !…
लहान गटात संगीता बारेला तर मोठ्या गटात मयुरी भोई प्रथम
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगांव – सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘ जनजाती गौरव पंधरवाडा ‘ अंतर्गत वारली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
वारली चित्रकला स्पर्धेमध्ये मोठ्या गटांमध्ये प्रथम मयुरी भोई, द्वितीय वैभव माळी, तृतीय भावना बारेला तर लहान गटामध्ये प्रथम संगीता बारेला, द्वितीय अर्चना बारेला, तृतीय रितु जाधव या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकविला. या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक एच डी माळी यांचे मार्गदर्शन लाभले. पर्यवेक्षक म्हणून शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे, एम बी मोरे, पी डी पाटील यांनी काम पाहिले. शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

