अमळनेर प्रभाग 13 ब : शिक्षण, अनुभव आणि निस्वार्थी सेवेत विश्वास – सुनील महाजनच्या उमेदवारीमुळे उभा राहणार बदलाचा प्रवाह!” नगरपरिषद निवडणूक 2025 : 21 वर्षांच्या पोलिस सेवेतून, कायद्याचे सखोल ज्ञान व अभ्यासातून सिद्ध अनुभव घेऊन आता जनतेच्या सेवेत!
![]()
“अमळनेर प्रभाग 13 ब : शिक्षण, अनुभव आणि निस्वार्थी सेवेत विश्वास – सुनील महाजनच्या उमेदवारीमुळे उभा राहणार बदलाचा प्रवाह!”
नगरपरिषद निवडणूक 2025 :
21 वर्षांच्या पोलिस सेवेतून, कायद्याचे सखोल ज्ञान व अभ्यासातून सिद्ध अनुभव घेऊन आता जनतेच्या सेवेत!
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन):
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 13 ब मध्ये उच्चशिक्षित आणि अनुभवी उमेदवार सुनील दयाराम महाजन यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. बी.ए., एम.ए. इतिहास आणि SET परीक्षा उत्तीर्ण असलेले सुनील महाजन हे २१ वर्षांच्या पोलिस सेवेतून प्राप्त अनुभव, कायद्याचे सखोल ज्ञान आणि प्रामाणिकपणा यांचा संगम जनतेसाठी घेऊन येत आहेत.
सध्या प्रभागातील नागरिकांमध्ये चर्चा जोर धरत आहे. अनेक जण सांगतात —
“आता खरा आणि योग्य उमेदवार निवडण्याची वेळ आली आहे. सुनील भाऊंच्या नेतृत्वाखाली आमचे हित सुरक्षित राहील, शिक्षण, नोकरी, उद्योगधंदे आणि भविष्यासाठी विचार केला जाईल.”
लोकांच्या दृष्टीने सुनील महाजन हे निस्वार्थी, साधे राहणीसह उच्च विचार असणारे, गरिबीतून मोठे झालेले आणि समाजसेवेची खरी जाणीव असलेले उमेदवार आहेत. वार्डात दबक्या आवाजात सुरू झालेल्या चर्चेत नागरिक ठामपणे सांगत आहेत —
“भाऊंनाच मत द्यायचं; खरे नेतृत्व आणि बदल यांची प्रतीक्षा संपली पाहिजे.”
सुनील महाजन यांच्या उमेदवारीने प्रभागात नव्या विचारांची, नव्या उर्जेची आणि बदलाची शक्यता निर्माण केली आहे. नागरिक उत्सुकतेने आणि आशेने या उमेदवारीच्या मार्गावर उभे आहेत, ज्यातून प्रभाग 13 ब मध्ये सच्चे आणि कार्यक्षम नेतृत्व घडण्याची दृष्टी स्पष्टपणे दिसून येत आहे.

