नोकरी द्या नाहीतर भत्ता द्या — अन्यथा राजीनामा द्या!” NSUI तर्फे बेरोजगारीविरोधी राज्यव्यापी आंदोलनाची सुरूवात!
![]()
“नोकरी द्या नाहीतर भत्ता द्या — अन्यथा राजीनामा द्या!”
NSUI तर्फे बेरोजगारीविरोधी राज्यव्यापी आंदोलनाची सुरूवात!
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन):
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, माजी मंत्री तथा आमदार सतेज (बंटी) पाटील साहेब, माजी मंत्री अमित विलासराव देशमुख साहेब, माजी मंत्री नसीम खान साहेब, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे साहेब, खासदार शोभा बच्छाव मॅडम आणि NSUI प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून “नोकरी द्या नाहीतर भत्ता द्या, अन्यथा राजीनामा द्या” ही राज्यव्यापी मोहीम अधिकृतपणे सुरू करण्यात आली.
या मोहिमेचा उद्देश राज्यातील विद्यार्थ्यांना व बेरोजगार तरुणांना न्याय मिळवून देणे आणि शासनाचे लक्ष रोजगार निर्मितीकडे वेधणे हा आहे. सध्याच्या परिस्थितीत युवकांमध्ये वाढत चाललेली बेरोजगारी ही केवळ सामाजिकच नव्हे तर आर्थिक संकटाची जननी ठरत असल्याने NSUI ने थेट शासनाला प्रश्न विचारण्याचा निर्धार केला आहे.
मोहिमेच्या उद्घाटनावेळी अॅड. कौस्तुभ पाटील यांनी या उपक्रमाचे उद्दिष्ट आणि पुढील कार्ययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “राज्यातील तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले जात असताना आम्ही शांत बसणार नाही. शासनाने तात्काळ ठोस रोजगार धोरण आणावे, अन्यथा जनआंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल.”
या आंदोलनाद्वारे NSUI तर्फे विविध जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी मोर्चे, निवेदन सादरीकरण व जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहेत. तरुणांच्या हक्कासाठी लढणारी ही चळवळ विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करीत असून, शिक्षित बेरोजगार वर्गात या मोहिमेबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

