डॉ.वंदना भामरे राष्ट्रीय फुले पुरस्काराने सन्मानित*:
![]()
*डॉ.वंदना भामरे राष्ट्रीय फुले पुरस्काराने सन्मानित*:
————————————–
अमळनेर प्रतिनिधी : खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज (स्वायत्त) मधिल गणित विषयाचे सहाय्यक प्राध्यापक *डॉ.वंदना पोपटराव भामरे* यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद मार्फत दिले जाणारे राष्ट्रीय महात्मा फुले शिक्षक पुरस्कार (२०२५) देऊन सन्मानित करण्यात आले.
*पुरस्काराचे स्वरूप*
● प्रमाणपत्र
● ट्रॉफी
● रोख ५०,०००/-
प्रस्तुत पुरस्कार सोहळा हा २८ ऑक्टोबर २०२५ रोजी स्व.वि.दा.सावरकर नाट्यगृह,रत्नागिरी येथे संपन्न झाला.या यशा बद्दल डॉ.वंदना भामरे यांचा सत्कार करताना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव,डॉ.विजय तुंटे, डॉ.धिरज वैष्णव, डॉ.अमित पाटील,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.जितेंद्र पाटील,प्रा.विजय साळुंखे,कमलाकर पाटील,प्रा.रागिणी सैंदाणे,प्रा.सुचित्रा रत्नपारखी,प्रा.नेहा पाटील,महेंद्र चौधरी,मिलिंद नेवे,नितीन सोनार,सुरसिंग यांनी अभिनंदन व कौतुक केले.


