अध्यात्मामुळे आत्मा व शरीर यांचे रहस्य उलघडते…. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्रजी भोळे
![]()
अध्यात्मामुळे आत्मा व शरीर यांचे रहस्य उलघडते…. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्रजी भोळे
पुणे वळती : आत्मा शरीराचा एक अविभाज्य घटक आहे. आत्म्याच्या अस्तित्वामुळेच शरीर जिवंत राहू शकते, मृत होऊ शकते. अध्यात्मिक तत्त्वानुसार आत्मा अमर आहे. तसेच मृत्यूनंतर ही आत्म्याचे अस्तित्व टिकून राहते व शरीर हे नश्वर आहे. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण झालेले कपडे बदलवितो त्याप्रमाणेच आत्मा हे जीर्ण झालेले शरीर सोडून देतो. म्हणून मनुष्याने जीवन जगत असताना आपण पृथ्वीतलावर पाहुणे आहोत मालक नाहीत याचे भान ठेवावे. मनुष्याने प्राचीन तत्त्वज्ञान
अध्यात्मिकता जोपासून पृथ्वीतलावर सुख शांती मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. वळती येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गीतेतील अध्याय दुसरा श्लोक क्रमांक तेवीस व ज्ञानेश्वरीला वर आधारित प्रवचनात ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे पुढे म्हणाले की जीवनाचे खरे रहस्य समजण्यासाठी अध्यात्मिक प्रवृत्ती जोपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी साधुसंतांनी जो उपदेश केलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. शरीर , आत्मा ,मनुष्याचे जीवन याचा उलघडा अनेक उच्च विद्याविभूषितांनाही होऊ शकत नाही. तो केवळ अध्यात्माद्वारेच होऊ शकतो,अध्यात्मामुळे आत्मा व शरीर यांचे रहस्य उलगडते. अध्यात्माद्वारेच आत्मा व शरीर यांचे रहस्य उलघडते असे मत ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. येथील अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ह भ प बाळकृष्ण सूर्यवंशी महाराज, डॉ. रवींद्र भोळे महाराज उरुळी कांचन, ह भ प धनंजय महाराज घोलप, गोकुळ महाराज कुंजीर, ईश्वरी महाराज कुंजीर, सनईकरमहाराज देवाची आळंदी, यादव महाराज, यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ह भ प वैभव महाराज कुंजीर, श्रावणी महाराज कुंजीर, अनुष्का महाराज कुंजीर, दत्तात्रय महाराज कुंजीर, श्रेयस महाराज कुंजीर, गणेश महाराज कुंजीर, पायल महाराज कुंजीर, यांच्या कीर्तनाचे आयोजनही करण्यात आले होते. याप्रसंगी काल्याचे किर्तन ह भ प चैतन्य महाराज शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन अखंड हरिनाम सप्ताह समिती, सर्व वरती ग्रामस्थ, उद्योजक श्री एल बी कुंजीर सरपंच वळती, सौ कुसुमताई लक्ष्मण कुंजीर माजी सरपंच वळती,ह भ प जालिंदर शिवराम कुंजीर, ह भ प दामोदर दिनकर कुंजीर, ह भ प दत्तात्रय निवृत्ती कुंजीर, ह भ प दामोदर यशवंत कुंजीर, ह भ प शिवाजी किसन कुंजीर, ह भ प कुमारी पायल जालिंदर कुंजीर महाराज, युवा कीर्तनकार वळती, ह भ प सुदाम बबन कुंजीर तसेच अनेक प्रतिष्ठित गावकरी समस्त ग्रामस्थ यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे करण्यात आले होते. याप्रसंगी अनेक भाविक भक्तांनी अन्नदान केले. याप्रसंगी पंचक्रोशीतील वारकरी ,गावकरी भाविक ,भक्त, भजनी मंडळ तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार भजनकार उपस्थित होते.

