करणखेडा विद्यालयात ग्रामविकास शिक्षण मंडळाचे संस्थापक कै. न्हानाभाऊ पाटील यांना ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली — शिक्षण व सहकार क्षेत्रातील कार्यातून न्हानाभाऊंनी घडवली ग्रामीण विकासाची वाटचाल
![]()
करणखेडा विद्यालयात ग्रामविकास शिक्षण मंडळाचे संस्थापक कै. न्हानाभाऊ पाटील यांना ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली
— शिक्षण व सहकार क्षेत्रातील कार्यातून न्हानाभाऊंनी घडवली ग्रामीण विकासाची वाटचाल
अमळनेर प्रतिनिधी :
ग्रामविकास शिक्षण मंडळाचे आद्य संस्थापक व सहकार क्षेत्रातील महानायक आदरणीय कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय, करणखेडा तर्फे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयाचे स्थानिक चेअरमन आदरणीय आबासाहेब श्री विश्वासराव विनायकराव पाटील यांनी न्हानाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ग्रामविकास शिक्षण मंडळाचे संचालक आदरणीय भैय्यासाहेब श्री दिनेश वासुदेव साळुंखे, गावाचे माजी उपसरपंच श्री महेंद्र पाटील तसेच श्री तुषारदादा गरुड विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नंदकिशोर शंकरराव पवार यांनीही अभिवादन केले.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पवार यांनी विद्यार्थ्यांना कै. न्हानाभाऊ पाटील यांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “न्हानाभाऊ पाटील यांनी शिक्षण व सहकार या दोन माध्यमातून ग्रामीण समाजाला विकासाची दिशा दिली. त्यांची विचारधारा आजही आपल्याला मार्गदर्शक ठरते.”
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना पुण्यतिथी निमित्त चॉकलेटचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांनी न्हानाभाऊंच्या कार्याचा आदर्श ठेवून समाजसेवेचा संकल्प केला.

