मुडी गावाने गमावले खंबीर नेतृत्व… माजी सभापती विजू आण्णा अनंतात विलीन
![]()
मुडी गावाने गमावले खंबीर नेतृत्व…
माजी सभापती विजू आण्णा अनंतात विलीन
अमळनेर प्रतिनिधी :
मुडी (ता. अमळनेर) येथील रहिवासी, माजी पंचायत समिती सभापती कै. चंद्रसेन सुरसेन सूर्यवन्सी (विजू अण्णा) वय ६५ यांचे दि. १०/११/२०२५ सोमवार रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ५ वाजता राहत्या घरून निघाली. त्यांच्या अंत्ययात्रेत सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
“जथी मुडी थथी, गुलाल पडी…”
या म्हणीला केवळ कल्पनेत नव्हे तर वास्तवात उतरवणारी व्यक्ती म्हणजे विजू आण्णा सूर्यवंशी. ज्याच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले, त्याचा विजय निश्चित — हे गावकऱ्यांचे ठाम मत.
मुडी पंचक्रोशीमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा रुजवण्यात आण्णांचा मोठा वाटा होता. 2000-2001 च्या पंचायत समिती निवडणुकीत अल्प मतांनी पराभव झाला, पण निराश न होता समाजसेवा त्यांच्या जीवनाचे ब्रीद राहिले.
त्या काळात म्हणायचे —
“राजकारणासाठी पैसा हवा, पण समाजकारणासाठी मोठं मन!”
त्यांच्या मनाची श्रीमंती मोठी होती म्हणूनच २००६ च्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून मुडी गणातून विक्रमी मतांनी विजय मिळवला.
गावातील किंवा पंचक्रोशीत कुठेही अन्याय, पक्षपात किंवा अडचण दिसली तर विजू आण्णा स्पष्टपणे आवाज उठवायचे.
लोकांचे प्रश्न सोडवणे, रात्री-बेरात्री धाव घेणे, संकटात आधार देणे — ही त्यांची ओळख.
मुडीसाठी ते केवळ नेता नव्हते…
ते आधारस्तंभ, मार्गदर्शक आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व होते.
त्यांच्या जाण्याने गावात शोककळा पसरली असून सर्व समाजबांधवांच्या डोळ्यांत पाणी आहे. विजू आण्णांचे कार्य, त्यांची निष्ठा आणि माणुसकीची परंपरा चिरंतन स्मरणात राहील.
त्यांच्या निधनाचे वृत्त करतात शैक्षणिक सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

