आर.सी.पटेल आयएमआरडी च्या एम.सी.ए व एम.सी.ए.(इंटीग्रेटेड) चे 4 विदयार्थी विदयापीठ गुणवत्ता यादीत
![]()
आर.सी.पटेल आयएमआरडी च्या एम.सी.ए व एम.सी.ए.(इंटीग्रेटेड) चे 4 विदयार्थी विदयापीठ गुणवत्ता यादीत
शिरपूर प्रतिनिधी मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क
(वेदांत माळी,गौरव पाटील)
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगाव यांनी माहे एप्रिल-मे 2024-2025 या वर्षामधील घेण्यात आलेल्या परिक्षेच्या गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली, त्यामध्ये आर.सी.पटेल आय.एम.आर.डी परिसंस्थेतील विदयार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत परिसंस्थेची परंपरा कायम राखली. आय.एम.आर.डी. परिसंस्थेतील विदयार्थी विविध अभ्यासक्रमात सतत गुणवत्ता यादीत चमकतात.
एम.सी.ए. अंतीम वर्षामधुन परीसंस्थेतील बारी कुमुद ईश्वर हिने 09.81 सी.जी.पी.ए., ओ. ग्रेड मिळवुन विदयापीठ गुणवत्ता यादीत द्वितीय तसेच बऱ्हाटे राहुल एकनाथ याने 09.75 सी.जी.पी.ए., ओ. ग्रेड मिळवुन विदयापीठ गुणवत्ता यादीत तृतीय स्थान मिळविले.
एम.सी.ए. (इंटीग्रेटेड) अंतीम वर्षामधुन परीसंस्थेतील धोबी राजश्री दीपक हीने 9.79 सी.जी.पी.ए., (एकूण गुण 5890) ओ. ग्रेड मिळवुन विदयापीठ गुणवत्ता यादीत प्रथम तसेच महाजन वेंदांत जितेंद्र याने 9.79 सी.जी.पी.ए. , (एकूण गुण 5790) ओ. ग्रेड मिळवुन विदयापीठ गुणवत्ता यादीत द्वितीय स्थान मिळविले.
विदयार्थी हे नेहमी चांगल्या गुणांनी यशस्वी व्हावे व चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट मिळावे असा माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल याचा मानस असतो त्यासाठी परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांच्या नेहमी मिळणा-या मार्गदर्शनामुळे विदयार्थी हे घवघवीत यश संपादन करत असतात.विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विभागप्रमुख व प्राध्यापकांचे मोलाचे योगदान मिळत असते.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मा.आ.अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतन भाई पटेल, राजगोपालजी भंडारी (सचिव आर . सी . पटेल एज्युकेशनल ट्रस्ट ), रेषादीदी पटेल (संचालक आर . सी . पटेल एज्युकेशनल ट्रस्ट), अतुलभाऊ भंडारी (संचालक आर . सी . पटेल एज्युकेशनल ट्रस्ट), परिसंस्थेच्या संचालिका डॉ.वैशाली पाटील, एम.सी.ए. विभागप्रमुख डॉ.मनोज बेहेरे, आयक्युएसी समन्वयक डॉ. मनोज पटेल, पदवी विभागप्रमुख डॉ.तुषार पटेल यांनी केले. तसेच डॉ.मनोज सोनवणे, डॉ. अमित पाटील, प्रा. विशाल पवार, प्रा. छाया पाटील, प्रा. विठ्ठल पाटील, प्रा. रोहिणी पाटील, प्रा. दिपाली न्हालदे, प्रा. राहुल बडगुजर, प्रा.धनश्री पाटील, प्रा. विवेक चव्हाण, प्रा. हर्षदा चौधरी, प्रा. सुचिता जाधव, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. रोशनी बाविस्कर , प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. आयेशा पिंजारी, प्रा. वृषाली तांबे , प्रा. हर्षल भामरे, प्रा. श्रेयश पाटील, प्रा. अर्चना जडे यांनी मागर्दशन केले.

