प्रेमविवाहासाठी पालकांची संमती बंधनकारक करण्याची मागणी ‘भारत जागृत मंच’कडून पालकमंत्री यांना निवेदन
1 min read

प्रेमविवाहासाठी पालकांची संमती बंधनकारक करण्याची मागणी ‘भारत जागृत मंच’कडून पालकमंत्री यांना निवेदन

Loading

प्रेमविवाहासाठी पालकांची संमती बंधनकारक करण्याची मागणी
‘भारत जागृत मंच’कडून पालकमंत्री यांना
निवेदन

अमळनेर प्रतिनिधी:-

महाराष्ट्र राज्यात वाढत्या प्रेमविवाहाच्या घटनांमुळे सामाजिक असंतुलन आणि कुटुंबांतील मतभेद वाढत असल्याचे कारण देत, ‘भारत जागृत मंच’ने’ राज्य सरकारकडे प्रेमविवाहासाठी आई वडील व पालकांची संमती अनिवार्य करणारा कायदा अतीतातडीने लागू करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात मंचं’ने शासनाला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अल्पवयीन आणि प्रौढ युवक-युवतींमध्ये प्रेमसंबंधांमुळे देशभरात अनेक गंभीर गुन्हे, प्रेम प्रकरणातून फसवणुकीच्या घटना आणि खूनाचे प्रकार वाढीस लागले आहेत.अशा प्रेम विवाहांमुळे अनेक वेळा समाजातील असंख्य कुटुंबीयांवर मानसिक ताण येऊन आत्महत्येसारख्या घटना घडत असल्याचे मंचं’चे मत आहे.
📜 मुख्य मागण्या :
१. विवाह नोंदणीच्या वेळी आई वडील व पालकांची प्रथम संमतीपत्र अनिवार्य:
प्रेमविवाहाची नोंदणी करताना नोंदणी अधिकारी, नगरपालिका अथवा महानगरपालिका यांनी दोन्ही पक्षांच्या पालकांचे लेखी संमतीपत्र घेणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक करावे.
२. आई वडील व पालकांना बेदखल करण्याचा अधिकार:
आई वडील व पालकांच्या संमतीशिवाय पळून जाऊन विवाह करणाऱ्या युवक-युवतींना त्यांच्या पालकांनी संपत्ती आणि कुटुंब नोंदीतून बेदखल करण्याचा अधिकार कायद्यात द्यावा.
३. प्रेमविवाह संस्था आणि मंदिरांवर नियंत्रण:
राज्यातील सार्वजनिक ट्रस्ट, मंदिर संस्था आणि विवाह नोंदणी केंद्रांवर देखरेख ठेवून धर्मदाय आयुक्त कार्यालयामार्फत तपासणी करावी. संशयास्पद विवाह नोंदींवर तात्काळ कारवाई व्हावी.
मंच’ने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, “आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करणाऱ्या युवक-युवतींच्या वागण्यामुळे समाजात, आई-वडील व पालकांची बदनामी होत असून, हिंदू संस्कृतीला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्रेमविवाहासाठी आई वडील व पालकांची प्रथम संमती घेणे अत्यावश्यक ठरते.”
‘भारत जागृत मंच’ने हे निवेदन राज्य शासनाला पाठवून २१ दिवसांच्या आत आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. तसेच या मुद्यावर लोकसभा व विधानसभेत विधेयक मांडून अति तातडीने मंजुरी मिळावी, अशी मागणी मंचने केली आहे.
मंचंच्या म्हणण्यानुसार, या कायद्याची अति तातडीने अंमलबजावणी झाल्यास सर्व समाजात आई वडील व पालकांचा सन्मान, सामाजिक शिस्त आणि हिंदू संस्कृतीचे रक्षण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
अमळनेर येथे आज 09/11/2025 रोजी, श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथील कार्यक्रमात मा.ना. कॅबिनेट तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित भारत जागृत मंचचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री संतोष बाबुराव पाटील,तसेच
स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल,सामाजिक कार्यकर्ते सुनील दयाराम महाजन, नवप्रवर्तनवादी सामाजिक कार्यकर्ते. संदीप युवराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते.. तालुक्यातील असंख्य आई वडिल,पालक यांच्या संमती स्वाक्षरीने विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *