अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : तयारीला वेग  अमळनेरमध्ये लोकशाहीचा महोत्सव — 18 प्रभाग, 36 जागा, 89,751 मतदार
1 min read

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : तयारीला वेग अमळनेरमध्ये लोकशाहीचा महोत्सव — 18 प्रभाग, 36 जागा, 89,751 मतदार

Loading

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : तयारीला वेग

अमळनेरमध्ये लोकशाहीचा महोत्सव — 18 प्रभाग, 36 जागा, 89,751 मतदार

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद सभागृहात सर्व पदाधिकारी व पत्रकारांची महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत रित्या पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजनासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार रूपेशकुमार सुराणा व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी निवडणुकीची प्रमुख माहिती पत्रकार परिषदेत दिली. अमळनेर नगरपरिषदेत यंदा एकूण 18 प्रभागांसाठी 36 जागांवर तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे. यासाठी शहरातील 97 मतदान केंद्रांवर एकूण 89,751 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यात 45,928 पुरुष, 48,821 महिला आणि 2 इतर मतदारांचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा एक अतिरिक्त मतदान केंद्र वाढवण्यात आले आहे. आचारसंहिता कक्ष प्रमुख म्हणून गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुबार मतदारांविषयी विचारणा झाल्यावर मुख्याधिकारी शिंदे यांनी सांगितले की, पालिका कर्मचार्‍यांकडून तपासणी सुरु असून मतदारांकडून परिशिष्ट-‘अ’ भरून घेण्यात येईल, तसेच दुबार मतदार असल्यास ती नोंद मतदार यादीत केली जाईल. उमेदवारांच्या सोयीसाठी नगरपालिकेत ‘वन विंडो योजना’ अंतर्गत सात टेबलची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक टेबलावर तीन प्रभागांचे काम पाहिले जाईल तर नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले आहे. यंदा मतमोजणी मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे ३ डिसेंबर रोजी होणार असून प्रतिनिधींना नेमण्यासाठी उमेदवारांनी किमान तीन दिवस आधी अर्ज करावेत, असे आवाहन तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी केले.
——
निवडणूक तयारीत प्रशासन सज्ज — पारदर्शक आणि शिस्तबद्ध निवडणूक प्रक्रियेसाठी सर्वांच्या सहकार्याचे आवाहन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *