लासूरच्या सातपुडा स्टेडियमवर क्रिकेटची धूम— जिल्हाभरातील संघांचा उत्स्फूर्त सहभाग! , ३१ हजारांच्या प्रथम पारितोषिकाने उत्साहात भर
![]()
लासूरच्या सातपुडा स्टेडियमवर क्रिकेटची धूम— जिल्हाभरातील संघांचा उत्स्फूर्त सहभाग!
३१ हजारांच्या प्रथम पारितोषिकाने उत्साहात भर
लासूर प्रतिनिधी
येथील महाकाल ग्रुप यांच्या वतीने नुकतेच भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाट्न संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्षत्रिय माळी समाज पुणे अध्यक्ष लिलाधर मगरे होते तर स्पर्धेचे उद्घाटन ज्ञानयोग फाऊंडेशन अध्यक्ष निलेश पाटील, वि.का सोसायटी अकुलखेडा येथील संचालक राहुल चौधरी, अमीर प्रतिष्ठान अध्यक्ष रमजान तडवी यांच्या शुभहस्ते पार पडले.
सदर स्पर्धा गावातील सातपुडा स्टेडियम येथे आयोजित केली असून चोपडा तालुक्यासह शिरपूर,अमळनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव, धुळे येथील संघांनी देखील यात सहभाग नोंदविला आहे.
स्पर्धेत विजेत्या संघांना विविध देणगीदार यांच्या माध्यमातून ३ पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.यात प्रथम पारितोषिक ज्ञानयोग फाऊंडेशन अध्यक्ष निलेश पाटील सर यांच्यातर्फे ३१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक वि.का सोसायटी अकुलखेडा संचालक राहुल चौधरी यांच्यातर्फे २५ हजार रुपये,तृतीय पारितोषिक अमीर प्रतिष्ठान अध्यक्ष रमजान तडवी यांच्या वतीने २१ हजार रुपये जाहीर करण्यात आले आहे.
तसेच विविध उत्तेजनार्थ पारितोषिक विविध संस्थाचे आजी माजी पदाधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास क्षत्रिय माळी समाज अध्यक्ष ए.के.गंभीर सर,चोपडा बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील,चोपडा सूतगिरणी संचालक अमृतराव वाघ तसेच शंकर माळी,कैलास महाजन,हिम्मतराव महाजन,दिलीप कोळी,गोविंद माळी,देवीलाल बाविस्कर,किशोर महाजन,कैलास बाविस्कर,मालखेडा सरपंच गणेश पाटील,योगेश पाटील यांसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी केले तसेच सूत्रसंचालन प्रेमराज शेलकर, समाधान माळी यांनी केले व आभार महेश महाजन यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाकाल गृप चे अध्यक्ष पवन महाजन, उपाध्यक्ष साहेबराव मगरे, सचिव कल्पेश माळी, सह सचिव अमोल गंभीर, खजिनदार निलेश राजकुळे, सदस्य भुमेश्वर मगरे, आर डी महाजन, नितीन माळी, योगेश माळी, मनोज माळी, विनोद मगरे आदी यांनी परिश्रम घेतले.

