परिश्रम दिव्यांग निवासी शाळेत विद्यार्थीदिन साजरा — महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन”
![]()
“परिश्रम दिव्यांग निवासी शाळेत विद्यार्थीदिन साजरा — महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन”
अमळनेर प्रतिनिधी : आज दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५ वार–शुक्रवार रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे विद्यार्थीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक शाळेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनिष जाधव यांच्या हस्ते भारताचे संविधान निर्माता, महामानव भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर श्री. जाधव सरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक संघर्षाची आणि विद्यार्थी जीवनातील प्रेरणादायी प्रवासाची माहिती उपस्थितांना दिली.
या प्रसंगी शाळेतील सर्व विशेष शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शाळेच्या कर्मचाऱ्यांनी केले.

