आयएमआरडी परिसंस्थेत वंदे मातरम राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
1 min read

आयएमआरडी परिसंस्थेत वंदे मातरम राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

Loading

आयएमआरडी परिसंस्थेत वंदे मातरम राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

शिरपूर प्रतिनिधी:
(वेदांत माळी
गौरव पाटील)

शिरपूर येथील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट , शिरपूर “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयएमआरडी परिसंस्थेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात बीसीए बीबीए बीएएमएस एमसीए आणि एमसीए (इंटिग्रेटेड) विभागातील 209 विद्यार्थी सर्व विभाग प्रमुख तसेच प्राध्यापक वर्ग व प्रशासकीय कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या सामूहिक गाण्याने झाली, ज्यामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या भावनेने भारून गेले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले, ज्यामुळे हा दिवस भारताच्या अभिमान, संस्कृती आणि वारशाचा गौरवपूर्ण सोहळा ठरला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच एमसीए व एमसीए (इंटिग्रेटेड) विभाग प्रमुख डॉ.मनोज बेहेरे, आय.क्यु.ए.सी. समन्व्यक डॉ. मनोज पटेल व पदवी विभाग प्रमुख डॉ. तुषार पटेल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन क्रीडा संचालिका पूजा जैन यांनी उत्साहाने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *