अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विभागीय उपायुक्त यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा.*
![]()
*अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विभागीय उपायुक्त यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा.*
जळगांव उत्तर नागरी (भुसावळ) प्रकल्पतील सेविका मदतनीस यांचे खालील प्रकल्प स्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवातेत यासाठी दि. 01.10.2025 पासून अंगणवाडी केंद्र बंद करतील अशी नोटीस युनियनने आयुक्त, ए.बा.वि.से.यो.नवी मुंबई आणि विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास विभाग नाशिक यांना दि.17.09.2025 दिली होती.
त्या अनुषंगाने आज महिला बालविकास विभाग नाशिकचे विभागीय उपायुक्त श्री.चंद्रशेखर पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ प्रकल्प कार्यालयात सेविका मदतनीस यांच्या अडचणी बाबत युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली.
बैठकीत सेविका मदतनीस यांच्या प्रकल्प स्तरीय अडचणी तातडीने सोडविण्याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी यांना श्री.पगारे साहेब यांनी सुचना वजा आदेश दिला.
या बैठकीत विभागीय उपायुक्त श्री.चंद्रशेखर पगारे (नाशिक),बालविकास प्रकल्प अधिकारी श्री.विजयसिंग परदेशी,युनियनचे पदाधिकारी रामकृष्ण बी.पाटील,संगीता निंभोरे,सविता महाजन,सरला कोलते,चेतना गवळी,सुरेखा पवार,शिला तायडे,संगीता कोळी आदीसह कार्यालयातील मुख्यसेविका आणि संबंधित कर्मचारी सहभागी झाले.

