गुणवंतांनी उच्च ध्येय निश्चित करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे!”  -विलासराव पाटील यांचे आवाहन  , गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला माळी महासंघाची कौतुकाची थाप
1 min read

गुणवंतांनी उच्च ध्येय निश्चित करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे!” -विलासराव पाटील यांचे आवाहन , गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला माळी महासंघाची कौतुकाची थाप

Loading

“गुणवंतांनी उच्च ध्येय निश्चित करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे!”

-विलासराव पाटील यांचे आवाहन

गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला माळी महासंघाची कौतुकाची थाप

धुळे प्रतिनिधी
समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हाच मुख्य मार्ग असून,गुणवंत विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय निश्चित करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे,असे आवाहन अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव पाटील यांनी केले.अखिल भारतीय माळी महासंघ,महानगर व धुळे तालुक्याच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६ आज ता.९ धुळे येथील कानुश्री मंगल कार्यालय,एकविरा माता मंदिर परिसर येथे उत्साहात पार पडला.
दहावी,बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या तसेच विविध स्पर्धा परीक्षा,पोलीस,अग्निवीर,व्यावसायिक अभ्यासक्रम आणि शासकीय सेवेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालक,शिक्षक आणि समाजाचाही गौरव होत असल्याचे यावेळी विलासराव पाटील यांनी सांगितले.कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे तसेच प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉ.सुशिल महाजन मान्यवरांनी सांगितले की,शिक्षणामुळे व्यक्तीचे जीवन बदलते आणि शिक्षित समाजचं प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतो.ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करून मिळविलेले यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी केवळ गुण मिळविण्यापुरते शिक्षण न घेता ज्ञान,कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी,असेही आवाहन करण्यात आले.
अखिल भारतीय माळी महासंघाच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे,गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि त्यांच्या पुढील वाटचालीस प्रेरणा मिळावी,या उद्देशाने दरवर्षी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाही धुळे शहर व तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.तसेच भाजपा धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे यांनी आजच्या जगात तंत्रज्ञानाचे जाळे पसरले असून इयत्ता चौथी पासून शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यापासून ते पदव्युत्तर होणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत डिजिटल तंत्रज्ञान शिक्षणाचा प्रभाव निर्माण झालेला आहे.आजची पिढी अतिशय हुशार असून अनेक साधारण कुटुंबातील मुले,मुली उच्चांक गाठून शासकीय नोकरीला गवसनी घालात आहेत. समाजाच्या प्रति हाच मोठा अभिमान आहे.असे प्रतिपादन केले.प्रमुख पाहुणे म्हणून धुळे येथील मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. सुशिल महाजन,भाजपा धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे,माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील,महिला अध्यक्षा तारका विवेकर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पुष्पलता पगारे,हनुमंत वाडिले,धुळे महानगरपालिकेचे नगरसेवक ललित माळी,नगरसेविका निशाताई महाजन, दोंडाईचा नगरसेवक प्रवीण महाजन,माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव देवरे,गुलाब माळी,धुळ्यातील महाजन हायस्कूल अध्यक्ष मिलिंद सोनवणे,संचालक राजेंद्र महाजन,माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आर.के.माळी,धुळे महानगर अध्यक्ष हरिश्चंद्र रेंडे,माळी महासंघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र गवळे,महानगर सचिव ज्ञानेश्वर महाजन,तालुका अध्यक्ष जितेंद्र महाजन, सी.बी.भदाणे,हिरामण चौधरी,डॉ.मधुकर चौधरी,डॉ दिनेश माळी,रवींद्र बिराडे,डॉ.अजय कुमार देवरे,रविकिरण पाटकरी,प्राध्यापक डॉ.नामदेव माळी,जयाताई बाविस्कर,श्री राजेंद्र माळी,श्री सुनील महाजन श्री किशोर माळी,स्वप्निल पगारे,श्री मुरलीधर बाविस्कर,श्री भरत बाविस्कर,श्री अनिल वाघ,श्री अनिल बिरारी,श्री एकनाथ अडावदकर,अकलाडचे सरपंच अजय माळी,आनंदखेडे चे सरपंच तीर्थदास अहिरे, राजेंद्र महाजन,अनिल सूर्यवंशी,जयवंत माळी,सुनीता गवळे,वंदना चौधरी,प्रतीक माळी,संदीप माळी,संजय महाजन, संतोष माळी,प्रवीण चौधरी,सुरेश जाधव,कैलास रोकडे,श्याम माळी,पत्रकार विठोबा माळी,प्रवीण माळी,सुनील माळी,सुमित वाघ,आदींची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करून शिक्षणाची कास धरावी, असे सांगितले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची कमतरता नसून,योग्य मार्गदर्शन,प्रोत्साहन आणि संधी मिळाल्यास ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करू शकतात. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपून समाजाच्या विकासात योगदान द्यावे,असेही आवाहन जिल्हाध्यक्ष आर.के.माळी यांनी केले.
अखिल भारतीय माळी महासंघाच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे,त्यांच्या गुणवत्तेचा गौरव व्हावा आणि इतर विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा मिळावी,या उद्देशाने गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास विद्यार्थी,पालक,शिक्षक,महासंघाचे पदाधिकारी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आर.के.माळी यांनी प्रास्ताविक केले. काशीनाथ माळी,जिजाबराव माळी यांनी सूत्रसंचालन केले.मनोज अहिरे यांनी आभार मानले.

 

 

 

 

 

फोटो कॅप्शन
धुळे कानुश्री मंगल कार्यालयात अखिल भारतीय माळी महासंघातर्फे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर व पदाधिकारी.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *