प्रभाग १६ ब मध्ये विकासासाठी ‘सौ. विद्या भदाणे’ यांची उमेदवारी — “जनसेवा हेच ध्येय” : भूषण भदाणे
1 min read

प्रभाग १६ ब मध्ये विकासासाठी ‘सौ. विद्या भदाणे’ यांची उमेदवारी — “जनसेवा हेच ध्येय” : भूषण भदाणे

Loading

प्रभाग १६ ब मध्ये विकासासाठी ‘सौ. विद्या भदाणे’ यांची उमेदवारी — “जनसेवा हेच ध्येय” : भूषण भदाणे

अमळनेर प्रतिनिधी:
अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिक, हितचिंतक व महिला भगिनींना दीपावली लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण संजय भदाणे यांनी प्रभागातील विकासाची नवी दिशा दाखवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
भूषण भदाणे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करत असताना आता माझ्या प्रभागाच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. त्यादृष्टीने माझ्या मातोश्री, सौ. विद्या संजय भदाणे या प्रभाग क्रमांक १६ (ब) — सर्वसाधारण महिला मतदारसंघातून उमेदवारी करू इच्छित आहेत.”
भदाणे कुटुंबाने यापूर्वीही प्रभागातील आनंद–दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी लोकांसोबत राहून सेवा केली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, “जनतेचा आशीर्वाद आणि आमचे नेते माजी मंत्री व आमदार आदरणीय अनिलदादा पाटील तसेच माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात विकासाचे नवे पर्व सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील काळातही लोकांनी साथ दिल्यास प्रभागात ठोस व प्रभावी कामे राबविण्याचे बळ मिळेल.”

“आशीर्वाद द्या, आम्ही विकास करून दाखवू”, अशी विनम्र विनंती त्यांनी नागरिकांना केली आहे.

भूषण संजय भदाणे
जिल्हाध्यक्ष — राष्ट्रवादी युवक काँग्रेस, जळगाव

सौ. विद्या संजय भदाणे
प्रभाग क्रमांक १६ (ब) — सर्वसाधारण महिला मतदारसंघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *