निसर्डी धरणाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करू –खासदार सुप्रिया सुळे”, जिल्हा परिषद उमेदवार दिपक पाटील वाघोदेकर यांची मुंबईत भेट
![]()
“निसर्डी धरणाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करू –खासदार सुप्रिया सुळे”
जिल्हा परिषद उमेदवार दिपक पाटील वाघोदेकर यांची मुंबईत भेट
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
आगामी जिल्हा परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद उमेदवारीसाठी इच्छुक असलेले दिपक पाटील वाघोदेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या चर्चेदरम्यान उमेदवारी जाहीर करण्याच्या प्रक्रियेवर चर्चा झाली. सुप्रिया सुळे यांनी दिपक पाटील यांच्याशी संवाद साधताना स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“उमेदवारी जाहीर करण्याचे प्रयत्न करू. कार्यकर्त्याचा सातत्यपूर्ण लढा आम्हाला महत्त्वाचा आहे.”
यावेळी निसर्डी धरणाच्या प्रलंबित प्रश्नावरही चर्चा झाली. सुप्रिया ताईंनी सांगितले की,
“निसर्डी धरणाबाबत स्थानिक नेत्यांशी चर्चा करून पाहणी करण्यात येईल. धरणाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू.”
या भेटीत दिवंगत कै. धनगर अर्जून पाटील यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या –
“ज्यांनी पक्षाला साथ दिली, ती पुण्याई वाया जात नाही. पुन्हा पक्षाशी नातं जोडून विकासाच्या लढ्यात सामील झालात, हे कौतुकास्पद आहे.”
तसेच शेतकरी व शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर कार्य करण्याचे मार्गदर्शन करताना त्यांनी पुढे असेही सांगितले –
“लढा हा स्वतःच्या अस्तित्वासाठी नाही, तर जनतेसाठी केला पाहिजे. शेतकरी समस्यांसाठी लढताना छातीशी तुळस ठेवून पुढे या. अडचणी आल्या तर पक्ष तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे.”
या भेटीला दिपक पाटील यांचे मार्गदर्शक आणि वडील बापूसाहेब जगन्नाथ राजमल पाटील उपस्थित होते. त्यांचे कौतुक करत सुप्रिया ताईंनी म्हटले –
“आपण असे दुर्मिळ वडील आहात की ज्यांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी नव्हे तर जनतेसाठी आपल्या मुलाला राजकारणात पुढे केलं. आपणासही मनःपूर्वक आभार.”
या भेटीमुळे वाघोदेकर समर्थकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा राजकीय रंग अधिक गडद होऊ लागला आहे.


