कार्य हा परिचय… समाजसेवा हा ध्यास!” अमळनेर नगर परिषद निवडणूक 2025: सुनील दयाराम महाजन यांची वॉर्ड क्र. १३-ब मधून उमेदवारी करणार
![]()
✦ “कार्य हा परिचय… समाजसेवा हा ध्यास!”
अमळनेर नगर परिषद निवडणूक 2025:
सुनील दयाराम महाजन यांची वॉर्ड क्र. १३-ब मधून उमेदवारी करणार
अमळनेर प्रतिनिधी – “कार्य हाच परिचय, प्रयत्न हीच ओळख आणि समाजसेवा हाच ध्यास” या ब्रीदवाक्यासह वॉर्ड क्रमांक १३-ब मधून सुनील दयाराम महाजन यांनी नगरपरिषद निवडणूक 2025 साठी उमेदवारी जाहीर केली आहे. प्रभागातील प्रश्नांची सखोल जाण, समस्या सोडवण्याचा अभ्यासू दृष्टिकोन आणि विकासाचा ठोस व्हिजन असलेले तरुण व तडफदार व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात.
सुनील महाजन हे मितभाषी, शिस्तप्रिय आणि जनसेवेचा सातत्याने ध्यास घेत काम करणारे असून गेल्या काही वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या छोट्या-मोठ्या तक्रारींची दखल घेऊन त्या निराकरणात त्यांनी पुढाकार घेतला आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, नाली व्यवस्था, सामाजिक सुविधा यांसह तरुणांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबवण्याची त्यांची दृष्टी स्पष्ट आहे.
“आपल्या समस्या आमच्या जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे सोडवू… विकासाच्या प्रत्येक वचनाला शब्दशः न्याय देऊ,” असा विश्वास सुनील महाजन यांनी व्यक्त केला आहे.
या प्रसंगी सुनील दयाराम महाजन यांनी प्रभागातील प्रिय बंधू-भगिनी, काका-काकू, मामा-मामी, आजी-आजोबा, दादा-वहिनी, शिक्षक, मार्गदर्शक, मित्र व शुभचिंतकांना मनापासून साद घातली—
“मी वॉर्ड क्रमांक १३-ब पुरुष गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपले आशीर्वाद, पाठबळ आणि विश्वास माझी सर्वात मोठी ताकद आहे. मी आपल्या सेवेसाठी सदैव अहोरात्र कार्यरत राहीन.”
नागरिकांमध्ये उमेदवारीबद्दल उत्सुकता असून प्रभागात निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे.

