जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास! प्रभाग क्र.१६ मधून विश्वनाथ (रवी) पिंताबर पाटील यांची दमदार उमेदवारी”
![]()
“जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास!
प्रभाग क्र.१६ मधून विश्वनाथ (रवी) पिंताबर पाटील यांची दमदार उमेदवारी”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : आगामी नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ मध्ये समाजसेवेची परंपरा, प्रामाणिक कार्यपद्धती आणि जनतेचा निर्विवाद विश्वास मिळवलेले श्री. विश्वनाथ (रवी) पिंताबर पाटील यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून, या घोषणेनंतर प्रभागात उत्साहाचे आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रवी पाटील यांना समाजकारणाचे आणि लोकसेवेचे संस्कार घरातूनच लाभले आहेत. त्यांचे वडील कै. पितांबर तात्या पाटील यांनी प्रभागातील प्रत्येक समस्येला स्वतः पुढाकार घेऊन सोडवले आणि नागरिकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्यातून विकसित झालेला जनविश्वास आजही कायम आहे.
२०११ साली नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासानंतर, रवी पाटील यांनी नगरपालिकेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेत अनेक ठोस विकास उपक्रम राबवले. पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणा, प्रकाशयोजना, स्वच्छता आणि रस्ते दुरुस्ती तसेच नागरिकांच्या सरकारी कामात योग्य मार्गदर्शन — या सर्व क्षेत्रांत त्यांनी परिणामकारक कामगिरी केली.
त्यांची “हातोडी पद्धतीची कार्यशैली” आणि थेट समस्याग्रस्तांसोबत उभे राहून समस्या सोडवण्याची वृत्ती यामुळे प्रभागात आज एकच वाक्य ऐकू येत आहे —
“समस्या कोणतीही असो, उपाय रवी पाटील यांच्याकडेच!”
प्रभागातील मतदारांमध्ये विश्वनाथ (रवी) पाटील यांनी आगामी निवडणुकीत उमेदवारी करावी अशी जोरदार चर्चा सुरू आहे. परिसरात तसेच व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि सोशल मीडियावरही तरुण वर्गामध्ये “रवी पाटील हेच योग्य उमेदवार” असा सूर उमटत आहे. समाजामध्ये सर्वांशी सुसंवाद राखणारे, सदैव उपलब्ध राहून प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे म्हणून त्यांची ओळख असल्याने, मतदार त्यांच्या उमेदवारीची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
रवी पाटील यांची ओळख पदाची नाही तर सेवाभावी कामाची आहे. त्यांना समाजातील ज्येष्ठ, महिला, युवक आणि कुटुंबांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळत आहे.
रवी पाटील म्हणतात —
“मी प्रतिनिधी नाही, मी जनसेवक आहे. आपला आशीर्वाद मिळाला, तर विकास हा माझा संकल्प आहे.”
प्रभागात सर्वत्र चर्चेचा एकच विषय —
“पक्ष कोणताही असो… आमचा नगरसेवक फक्त रवी पाटील!”


📞 संपर्क : 9423504252 — श्री. विश्वनाथ (रवी) पिंताबर पाटील
🤝 “आपण आशीर्वाद द्या… आम्ही विकास घडवू!”

