पाऊस आला… तरी पाऊल थांबले नाही!”  गजानन भक्तांच्या अमळनेर–शेंगाव १३ व्या पायीवारीचा भक्तिमय समारोप
1 min read

पाऊस आला… तरी पाऊल थांबले नाही!” गजानन भक्तांच्या अमळनेर–शेंगाव १३ व्या पायीवारीचा भक्तिमय समारोप

Loading

पाऊस आला… तरी पाऊल थांबले नाही!”

गजानन भक्तांच्या अमळनेर–शेंगाव १३ व्या पायीवारीचा भक्तिमय समारोप

अमळनेर प्रतिनिधी :
अखंड श्रद्धा, समर्पण आणि भक्तीभावाचा संदेश देणारी अमळनेर ते शेंगाव १३ वी पायीवारी आज बुधवार, दि. ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता  सांगता आनंदोत्सवासह आणि हरिओम जय गजाननाच्या घोषणेत संपन्न झाली. या वारीचा मुख्य उद्देश संत गजानन महाराजांप्रती भक्तीभाव व्यक्त करणे आणि समाजात प्रेम, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश पोहोचविणे हा होता.
या वैभवशाली वारीचे आयोजक प्रा.आर.बी.पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वारीत शिस्त, भक्तीभाव आणि आनंदाचे वातावरण अनुभवायला मिळाले. वार्‍याच्या सांगता सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी आणि गजानन भक्तांसाठी प्रेमपूर्वक मिष्टान्न भोजनाची व्यवस्था दीपक वैद्य (गुरुजी), पनवेल त्यांच्या मार्फत करण्यात आली. सर्वांनी आस्वाद घेतला

सत्संगाने उजळले वातावरण

श्री. नितीन भावे (गुरुजी) यांच्या निवासस्थानी
मुंदडा नगर १, पाण्याच्या टाकीसमोरील रस्ता, अमळनेर येथे वारीतील सर्व भक्तांनी एकत्र येऊन गजानन महाराजांचा सत्संग अनुभवला. मंत्रोच्चार, अभंग आणि भजनांनी वातावरण पवित्र आणि आनंदमय झाले. यावेळी बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

सेवाभावी कार्यकर्त्यांचा सत्कार
वारीमध्ये ज्यांनी आपापल्या क्षमतेनुसार—
आर्थिक सहकार्य केले,वाहतूक, मुक्काम, भोजन, चहा-फराळाची व्यवस्था पाहिली,
वारीतील जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली,अशा सर्व भाविकांचा संत गजानन महाराज सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रा. आर. बी. पवार आणि गजानन परिवारातील सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्संगाची सांगता दीपक वैद्य (पनवेल) आणि त्यांच्या सहपत्नीच्या सत्काराने करण्यात आली. तसेच पुरुषवारी प्रमुख प्रा. आर. बी. पवार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

आठवणींना उजाळा…
माजी प्राचार्य एल. जे. चौधरी यांनी गेल्या अनेक वर्षांच्या वारीतील सुखद आणि भावस्पर्शी अनुभवांची उजळणी केली. “वारी म्हणजे केवळ चाल नाही; ती एक अध्यात्मिक साधना आहे,” असे त्यांनी सांगताना भावूक क्षण रंगले.
“पाऊस आला… पण वारी थांबली नाही!”
वार्‍यादरम्यान वरुणराजा कोसळत होता. तरीही भक्तीचा वेग थांबला नाही.
“सर्वांच्या सहकार्याने वारी सुखरूप अमळनेरला परत आली,” असे वारी प्रमुख प्रा. पवार यांनी सांगितले. उपस्थित भक्तांनीही उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.
वाढदिवसाचा आनंद
वारीतील सेवेत सतत सक्रिय असलेल्या चेतन उपासनी यांचा आज वाढदिवस असल्याने
सर्वांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यानंतर महाआरतीच्या मंगलध्वनीत सर्व भाविकांनी एकत्र महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
उपस्थित प्रमुख मान्यवर :
अशोक भावे, नितीन भावे, चेतन उपासनी,
प्रा. आर. बी. पवार (अध्यक्ष — संत गजानन महाराज सेवा संस्थान),
एल. जे. चौधरी, ह. भ. प. पुंडलिक पाटील,
शिंपी सर, मोहित पवार, परेश पाटील,
सनी पाटील, जयवंत पाटील, रघुनाथ पाटील (पुजारी),विनोद पाटील सर, संजय पाटील सर, महेश भाऊसाहेब,संजय भाऊसाहेब, भूषण चौधरी, प्रदीप चौधरी,संजय पाटकरी,भूषण चौधरी,विजय पाटील,

प्रदीप चौधरी,कोळी भाऊसाहेब,आर. टी. बागूल, ह. भ. प. दत्तात्रय महाराज तसेच जिल्ह्यातील  अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *