ग्रंथातून संस्कृती, रंगभूमीतून संस्कार” – अमळनेरत मराठी वाड्•मय मंडळाचा उपक्रम  मराठी वाड्•मय मंडळ, अमळनेरतर्फे प्रा. आप्पासाहेब र. का. केले ग्रंथालयाचा वर्धापन दिन आणि जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा
1 min read

ग्रंथातून संस्कृती, रंगभूमीतून संस्कार” – अमळनेरत मराठी वाड्•मय मंडळाचा उपक्रम मराठी वाड्•मय मंडळ, अमळनेरतर्फे प्रा. आप्पासाहेब र. का. केले ग्रंथालयाचा वर्धापन दिन आणि जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा

Loading

ग्रंथातून संस्कृती, रंगभूमीतून संस्कार” – अमळनेरत मराठी वाड्•मय मंडळाचा उपक्रम

मराठी वाड्•मय मंडळ, अमळनेरतर्फे
प्रा. आप्पासाहेब र. का. केले ग्रंथालयाचा वर्धापन दिन आणि जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा

अमळनेर प्रतिनिधी
मराठी भाषेचा वारसा, वाचन संस्कृती आणि रंगभूमीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मराठी वाड्•मय मंडळ, अमळनेर यांच्या वतीने प्रा. आप्पासाहेब र. का. केले ग्रंथालयाचा वर्धापन दिन आणि जागतिक रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रजनीताई केले मॅडम होत्या. त्यांच्या हस्ते प्रा. आप्पासाहेब केले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मराठी रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य श्री. नाथा चितळे लिखित ‘बालनाट्यसंहिता’ चे पूजन करण्यात आले, ज्यातून आगामी पिढीला नाट्यकलेची प्रेरणा देण्याचा संदेश अधोरेखित झाला.
सुरेल वातावरण निर्मित करत, बासरी साधक व प्रचारक योगेश पाटील यांनी सुमधुर बासरीवादन सादर केले. त्यांच्या सुमधुर सादरीकरणाने कार्यक्रमाचे औत्सुक्य तर वाढविलेच, परंतु कला-संस्कृतीची सजीव अनुभूती सर्वांना मिळाली.
यानंतर विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
संदीप घोरपडे, नरेंद्र निकुंभ, भाऊसाहेब देशमुख, बन्सीलाल भागवत, विवेक भांडारकर, प्रा. यू. जी. देशपांडे, सौ. स्नेहा एकतारे आणि सौ. अरुणा विंचूरकर यांनी ग्रंथालयाचे महत्त्व, वाचनसंस्कृतीचा प्रसार आणि रंगभूमीच्या योगदानावर प्रभावी विचार मांडले.
कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन भैय्यासाहेब मगर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. श्याम पवार यांनी केले.
या सोहळ्यास श्यामकांत भदाणे, अजय केले, सौ. विनिता केले, प्रा. डॉ. माहेश्वरी, प्रदीप साळवी, डॉ. रविंद्र कुलकर्णी, सौ. कांचन शहा, सोमनाथ ब्रह्मे, प्रा. विजय तुंटे, डॉ. महेश पाटील, ॲड. के. व्ही. कुलकर्णी, अनिल सोनार, दिनेश नाईक, हनुमंत पाटील, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे, जगदीश कुलकर्णी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंडळाचे पदाधिकारी, संचालक, ग्रंथालय सभासद, वाचक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या उपस्थितीमुळे मराठी वाचन संस्कृती आणि रंगभूमीचा गौरव अधिकच वृद्धिंगत झाला.
“वाचन हीच खरी शक्ती आणि रंगभूमी ही अभिव्यक्तीची दिशा” – या संदेशाने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *