आई-बापांच्या संमतीशिवाय प्रेमविवाह रजिस्ट्रेशन बेकायदेशीर ठरवावे” – सामाजिक भान ठेवून कायदेशीर बदलाची तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी
![]()
“आई-बापांच्या संमतीशिवाय प्रेमविवाह रजिस्ट्रेशन बेकायदेशीर ठरवावे” – सामाजिक भान ठेवून कायदेशीर बदलाची तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी
अमळनेर प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्यात मुलांचे व मुलींचे प्रेमविवाह रजिस्ट्रेशन करताना पालकांची संमती अनिवार्य असावी, अशी मागणी भारत जागृत मंच आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
आजच्या तरुण पिढीमध्ये अनेक जण घरातून पळून जात आहेत आणि आई-बापांच्या अनुमतीशिवाय विवाह करत आहेत. या प्रकारामुळे अनेकदा कौटुंबिक प्रतिष्ठा धोक्यात येते, तसेच प्रेमाच्या नावाखाली गुन्हेगारी घटना उघडकीस येत आहेत. महाराष्ट्रात असे अनेक उदाहरणे दिसून आले आहेत, ज्यामुळे समाजात चिंता निर्माण झाली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, “मुले व मुली अविचारी कृत्य करत असल्यास, कौटुंबिक व सामाजिक प्रतिष्ठा पायदळी तुडवली जात असल्यास, त्यावर कायदेशीर बंधन आणणे आवश्यक आहे. आई-बापांच्या गैरहजेरीत विवाहाची नोंदणी बेकायदेशीर ठरली पाहिजे.”
भारतीय राज्यघटनेतील परंपरा आणि सामाजिक शिस्त यांचा सन्मान राखण्यासाठी, विवाह करताना दोन्ही कडील आई-बापांच्या उपस्थिती आणि संमती असणे आवश्यक असल्याचे जोरदार सांगितले आहे. तसेच धर्मांतर कायद्याप्रमाणे, विवाह करतानाही अशाच अटींचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत राजस्थान विधानसभेतदेखील चर्चेला चालना मिळाली असून, कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी हा बदल आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
यासाठी भारत जागृत मंचच्या वतीने लोकसभा, विधानसभा, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी (जळगाव), प्रांत अधिकारी तसेच अमळनेर तहसीलदार यांना सर्व पालकांच्या स्वाक्षरीसह निवेदन संतोष पाटील अमळनेर तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष, भारत जागृत मंच महाराष्ट्र अध्यक्ष व पदाधिकारी यांनी
४ नोव्हेंबर २०२५ रोजी सुपूर्द केले गेले. या निवेदनात आई-बापांच्या संमतीशिवाय मुलांचे व मुलींचे विवाह कायदेशीर ठरवू नयेत, अशी मागणी सामाविष्ट आहे.
> सामाजिक भान राखणे, पारंपरिक मूल्य जपणे आणि कायदेशीर नियम घालणे हाच समाजाचे रक्षण करण्याचा मार्ग आहे, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

