सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये भव्य ‘राष्ट्रीय एकता दौड’ संपन्न”
1 min read

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये भव्य ‘राष्ट्रीय एकता दौड’ संपन्न”

Loading

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये भव्य ‘राष्ट्रीय एकता दौड’ संपन्न”

अमळनेर प्रतिनिधी
जळगाव जिल्हा पोलीस दल व अमळनेर पोलीस स्टेशन तर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस २०२५ अनुषंगाने एकता दौड शहरातील महाराणा प्रताप चौक ते श्री.मंगळ ग्रह मंदिर पावेतो आयोजित करण्यात आली होती.
सदर एकता दौडचे मा.आ श्री.अनिल पाटील, अमळनेर विधानसभा मतदारसंघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व स्वतः मा.आ.श्री.अनिल पाटील यांनी तसेच मा. मुख्याधिकारी न.पा.अमळनेर तसेच त्यांच्याकडील अधिकारी व अंमलदार शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालय शाळा यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी सैनिक, पत्रकार बांधव, वकील बांधव, तरुण मित्र परिवार, शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, पोलीस पाटील, होमगार्ड, भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, मॉर्निंग वॉक ग्रुप चे सदस्य असे एकूण ३०० ते ३५० नागरीक उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *